adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पष्टाणे बुद्रुक येथील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळील अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी

पष्टाणे बुद्रुक येथील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळील अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी  धरणगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) पष्टाणे ...

पष्टाणे बुद्रुक येथील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळील अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी 


धरणगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पष्टाणे बुद्रुक, ता. धरणगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या पूर्व दिशेला असलेल्या गट क्रमांक २५२/१/अ या शासकीय जागेवर पत्र्याच्या शेडचे अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमण काढून टाकण्यासाठी दिनांक २९/०७/२०२५ रोजी मा. गट विकास अधिकारी धरणगाव, मा. तहसीलदार साहेब धरणगाव, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव तसेच मा. जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे लेखी अर्ज सादर करण्यात आले होते.

सदर अतिक्रमणधारकास ग्रामपंचायत पष्टाणे बुद्रुक यांच्यामार्फत तीन वेळा नोटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही अतिक्रमण हटविण्यात आलेले नाही. याशिवाय ग्रामपंचायत स्तरावरूनही याबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या अतिक्रमणामुळे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात अडथळा निर्माण होत असून सार्वजनिक हितास बाधा पोहोचत आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणी माननीय सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून अतिक्रमणाबाबत लवकरात लवकर ठोस कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी नम्र मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शासकीय जागेवरील अतिक्रमण हटवावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

No comments