परभणी महानगरपालिकेत लातूर जिल्ह्यातील शेल्हाळ गावच्या लेकीचा ऐतिहासिक विजय लातूर: उत्तम माने (संपादक -:- हेमकांत गायकवाड) परभणी येथील महा...
परभणी महानगरपालिकेत लातूर जिल्ह्यातील शेल्हाळ गावच्या लेकीचा ऐतिहासिक विजय
लातूर: उत्तम माने
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
परभणी येथील महानगरपालिका निवडणुकीत शेल्हाळ गावची लेक, सुप्रसिद्ध डॉक्टर अनिल कांबळे यांची सुकन्या कुमारी अबोली अनिल कांबळे यांनी नगरसेवक म्हणून दणदणीत विजय मिळवून शेल्हाळ गावासह संपूर्ण परिसराचा मान उंचावला आहे. त्यांच्या या यशामुळे गावात तसेच समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सामाजिक जाणिवेतून आणि विकासाभिमुख दृष्टिकोनातून निवडणूक लढवणाऱ्या अबोली कांबळे यांनी तरुणाई, महिला आणि सर्वसामान्य मतदारांचा विश्वास संपादन केला. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता व मूलभूत नागरी सुविधांसाठी काम करण्याचा त्यांचा निर्धार असून, परभणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्या कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या यशाबद्दल डॉक्टर अनिल कांबळे, कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच शेल्हाळ गावातील नागरिकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. शेल्हाळ गावची लेक नगरसेवकपदी विराजमान झाल्याने ही निवडणूक गावाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवली जाणार आहे.

No comments