adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खामगावच्या हिंदुत्ववादी चळवळीला नवी दिशा : ॲड. अमोल अंधारे यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश

  खामगावच्या हिंदुत्ववादी चळवळीला नवी दिशा : ॲड. अमोल अंधारे यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश  पल्लवी पाटील खामगाव ...

 खामगावच्या हिंदुत्ववादी चळवळीला नवी दिशा : ॲड. अमोल अंधारे यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश 


पल्लवी पाटील खामगाव 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अकोला येथे आयोजित भव्य जाहीर सभेत हिंदुत्ववादी विचारांचे प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेले ॲड. अमोल अशोकराव अंधारे यांनी शिवसेनेत अधिकृत जाहीर प्रवेश केला. महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्यनेते मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते, केंद्रीय मंत्री मा. ना. श्री. प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा हजारो शिवसैनिकांच्या साक्षीने पार पडला. या ऐतिहासिक कार्यक्रमास खामगाव विधानसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक मा. आमदार संजयजी रायमुलकर, तालुका प्रमुख राजू बघे, श्री. शशिकांतजी खेडेकर यांच्यासह तालुक्यातील शेकडो समर्थक, असंख्य पदाधिकारी, शिवसैनिक व हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजराजेश्वर नगरीत झालेल्या या जाहीर प्रवेशामुळे खामगाव परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


ॲड. अमोल अशोकराव अंधारे हे बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून, गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी संघ परिवारातील विविध संघटनांमध्ये निष्ठेने कार्य केले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बजरंग दल व विश्व हिंदू परिषद यांसारख्या संघटनांमध्ये शाखा संयोजक ते प्रांत सहमंत्री (विदर्भ) अशी महत्त्वाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली आहे. हनुमान व्यायाम मंडळाचे सचिव म्हणून त्यांनी सामाजिक कार्यातही मोलाचे योगदान दिले असून, त्यांना खामगाव नगरी गौरव पुरस्कार तसेच प्रेस क्लब खामगावकडून “जिल्हा गौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हिंदुत्व, राष्ट्रभक्ती व सामान्य कार्यकर्त्यांच्या न्यायासाठी सातत्याने लढणारे नेतृत्व म्हणून त्यांची संपूर्ण विदर्भात ओळख आहे. 


प्रवेशावेळी ॲड. अमोलभाऊ अंधारे यांनी उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब व केंद्रीय मंत्री मा. प्रतापरावजी जाधव साहेब यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच खामगाव तालुका व घाटाखालील परिसरातील तब्बल ५१०० हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश घडवून आणण्यासाठी खामगाव येथे भव्य जाहीर सभा घेण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.

यावेळी मा. एकनाथजी शिंदे साहेबांनी ॲड. अमोलभाऊंच्या पाठीवर आशिर्वादरूपी हात ठेवत “नक्की लवकरच येतो, कामाला लागा” असे आश्वासन दिले. या आश्वासनामुळे खामगाव परिसरातील शिवसैनिक, हिंदुत्ववादी कार्यकर्ते व अमोलभाऊ समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून, परिसरात हिंदुत्वाची नवी लाट उभी राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ॲड. अमोल अशोकराव अंधारे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या संघटनात्मक बळात मोठी वाढ होणार असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

No comments