पी_एम_श्री_जिल्हा_परिषद हायस्कूलमध्ये_बाळशास्त्री_जांभेकर_पत्रकार_दिन_उत्साहात_साजरा अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळग...
पी_एम_श्री_जिल्हा_परिषद हायस्कूलमध्ये_बाळशास्त्री_जांभेकर_पत्रकार_दिन_उत्साहात_साजरा
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जामोद:- पी. एम. श्री जिल्हा परिषद हायस्कूल,आसलगाव येथे मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिन अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भगवान भाऊ टापरे यांनी भूषविले. कार्यक्रमास पत्रकार बंधू दत्तू भाऊ दांडगे, पवनसिंग ठाकूर, मदन भाऊ बरडे, संजय भाऊ दांडगे, हरिदास भाऊ इंदोरे, गणेश भाऊ गिऱ्हे, दिलीप भाऊ इंगळे, राहुल भाऊ निर्मळ, मुन्ना भाऊ रावणचवरे, अनिल भाऊ दांडगेयांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच उपाध्यक्ष जीवन भाऊ रायपुरे हेही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल_भगत_सर_यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक-गुरुजनांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.यावेळी पत्रकारितेचे सामाजिक महत्त्व, सत्य व निर्भीड लेखनाची भूमिका याबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये सस्नेह,भगवान रामदास टापरे अध्यक्ष जिल्हा परिषद कें. म. प्रा. शाळा,असलगाव अध्यक्ष पी. एम.श्री जिल्हा परिषद हायस्कूल, असलगाव तालुका सरचिटणीस भारतीय जनता पार्टी, जळगाव जामोद संस्थापक जनसेवा कार्यालय, आसलगाव यांचे सहकार्य लाभले.


No comments