शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी राहुल कचरे यांची निवड भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी : (संपादक -:- हेमकांत गायकवाड...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी राहुल कचरे यांची निवड
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
हिंदुहृदयसम्राट, सरसेनापती, शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त यावल येथे जयंती उत्सव समितीची नुकतीच स्थापना करण्यात आली. या वेळी सर्वानुमते अध्यक्षपदी राहुल कचरे यांची निवड करण्यात आली.
तसेच उपाध्यक्षपदी नरेंद्र शिंदे, सचिवपदी राजू शेख, तर खजिनदारपदी शिवसेना युवा कार्यकर्ते गौरव सुनील जोशी यांची निवड करण्यात आली.
समितीच्या सदस्यपदी
मयूर संतोष खर्चे, सारंग बेहेडे, मनोज करणकर, पिंटू कुंभार, योगेश राजपूत पाटील, अजहर खाटीक, राहुल पवार, नरेंद्र माळी (खन्ना), भूषण खैरे, किशोर उर्फ गोलू माळी, जयेश तुकाराम बारी यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच सल्लागार म्हणून
यावल नगरपालिकेच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षा सौ. छाया अतुल पाटील,
शिवसेना तालुकाप्रमुख बापू कोळी,
माजी नगराध्यक्ष अतुल पाटील,
शिवसेनेचे नगरसेवक सागर कुमार चौधरी,
नगरसेविका सौ. वैशाली निलेश बारी,
शिवसेनेचे ज्येष्ठ विभागप्रमुख पप्पूभाई जोशी,
शहर उपप्रमुख संतोषभाई खर्चे,
विजय पंडित, प्रल्हाद बारी, हारून खान यांची निवड करण्यात आली.
या बैठकीचे प्रास्ताविक शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश भाऊ कवडीवाले यांनी केले. यावेळी समस्त नागरिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments