ऐतिहासिक फैजपूर नगराध्यक्षा पदी दामिनी सराफ विराजमान इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ऐतिहासिक फैजपूर नगरपरिषदेच्या निव...
ऐतिहासिक फैजपूर नगराध्यक्षा पदी दामिनी सराफ विराजमान
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ऐतिहासिक फैजपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपा च्या दामिनी पवन सराफ विजयी झाले नंतर २०२६ च्या प्रारंभी आपल्या लोकसेवेचा शुभारंभ केला आहे यापूर्वी टाळ मृदंग भजनाचे गजरात सराफ गल्ली येथून दिंडी द्वारे आपल्या शेकडो समर्थकांसह नगरपरिषद सभागृहात आयोजित कार्यक्रमात नगरपालिका प्रशासनाने नगराध्यक्षा व सर्व नगरसेवक नगरसेविका यांचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत करीत अभिनंदन शुभेच्छा दिल्या याप्रसंगी फाट्याक्यांची आतिषबाजी करण्यात येत जल्लोष करण्यात आला. तद्नंतर नगराध्यक्षा दालनात त्यांना नवनिर्वाचित नगरसेवक व नगरपालिका अधिकारी भाजप सेना पदाधिकारी कार्यकर्ते यांचे उपस्थितीत सन्मानपूर्वक खुर्चीवर विराजमान करण्यात आले
सर्वप्रथम सर्व नगरसेवक नगरसेविका यांना सोबत घेत सर्वागीण विकास हेच आमचे ध्येय असून यात प्रामुख्याने पाणी पुरवठा नियमित करणार आहे अवेळी पाणी पुरवठा होत असल्यानं महिला वर्ग यांना वेळेवर पाणी पुरवठा करणार आहे त्यासाठी पाणी पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांना सोबत बैठक घेऊ त्यासाठी सर्वांना मुबलक पाणी कसा होईल या कडे सर्वात लक्ष असेल तसेच पाणी,वीज,गटारी या नागरिकाच्या महत्वाच्या गरजा असून स्वच्छता याला प्राधान्य देऊन तसेच स्ट्रीट लाइट बाबत सर्व लाईट दुरुस्ती अथवा गरज पडल्यास नवीन लाईट लावण्याचे नियोजन करण्यात येणार आहे
शहराच्या जनतेने जो विश्वास दा खविला त्याला कोणताही तडा न जावू देता आम्ही त्याच्या आशीर्वाद रुपी मतदान दिल्यानं कायम त्याच्या ऋणात राहू असा तसेच शहराच्या विकासासाठी जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री ना.रक्षा खडसे, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आमदार अमोल जावळे व सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे याच्या माध्यमातून याच्या माध्यमातून सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध राहू असा आत्मविश्वासही लोकनियुक्त नगराध्यक्ष दामिनी सराफ यांनी पहिल्या प्रतिक्रियात व्यक्त केला आहे. याप्रसंगी सत्ताधारी नगरसेवक, भाजपा शिवसेना युती परिवार तसेच भाजपा उमेदवार, व सराफ परिवाराचे मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी, नगरपालिका अधिकारी कर्मचारी वृंद मोठया उपस्थित होते

No comments