ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात कांताई नेत्रालय तर्फे निशुल्क नेत्र तपासणी शिबिर संपन्न मुक्ताईनगर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...
ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात कांताई नेत्रालय तर्फे निशुल्क नेत्र तपासणी शिबिर संपन्न
मुक्ताईनगर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालय येथे वाचनालयाचे अध्यक्ष श्री एस ए भोईसर यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त कांताई नेत्रालय जळगाव यांचे तर्फे निशुल्क नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सुरेश कछवा यांचे हस्ते झाले अध्यक्षस्थानी पो. पाटील किशोर मेढे होते. कांताई नेत्रालय चे डॉ.अदनान शेख, प्रवीण राठोड यांनी नेत्र तपासणी केली. प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्य मोहन बेलदार , डॉ.रमेश कोळी, यमुनाबाई शेलार, शे.जैनुरबी, प्राचार्य बारी सर, शे.रशीद शे.रज्जाक, विक्रांत सावकारे, पवन पाटील, नजीर शेख,भाऊराव महाजन, शरद महाजन, नरेंद्र दुट्टे, शिवाजी पाटील, सुरेश महाजन, प्रकाश कोळी, रुस्तम बेलदार, किरण धायले, अनिल वाडीले, कुसुम बाई गायकवाड, सिंदुबाई पाटील, राजू लोहार, धनुभाऊ बाविस्कर, अनिल नावकर, गायत्री पतसंस्थेचे मॅनेजर गणेश नवकर, मेढे सर, नामदेव जिरी, अशोक वंजारी, ग्रंथपाल मधुकर वानखेडे, व मान्यवर, लाभार्थी, वाचक उपस्थित होते.
नेत्र तपासणी 70 रुग्णांची व मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 37 रुग्णांची निवड करून 6 जानेवारी 2026 रोजी कांताई नेत्रालय जळगाव येथे ऑपरेशन मोफत करण्यात येणार आहे.

No comments