मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना दिलासा, तीन महिन्यांचे पैसे खात्यात एकत्रित जमा होणार ! सौ. शुभांगी सरोदे प्रतिनिधी. (स...
मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना दिलासा, तीन महिन्यांचे पैसे खात्यात एकत्रित जमा होणार !
सौ. शुभांगी सरोदे प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्रांतील महिलांसाठी दिलासादायक आणि आनंद देणारी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांच्या खात्यात लवकरच एकाच वेळी 4.500 रुपये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आत्तापर्यंत दरमहा 1500 रुपये मिळणाऱ्या या योजनेत आता मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्याचे पैसे एकत्रित खात्यावर जमा होणार आहेत. मकर संक्रांतीच्या अनुषंगाने लाडक्या बहिणींना सरकारकडून मोठे गिफ्ट मिळणार आहे. सध्या राज्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. आचारसंहिता लागू असतानाही या योजनेचा हप्ता कसा वितरित करता येईल याबाबत सरकार स्तरांवर हालचाली सुरू आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना नोव्हेंबर,डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे अनुदान एकत्रित देण्याचा विचार केला जात आहे. त्यामुळे आता एकाच वेळी 4.500 रुपये मिळणार असल्याने अनेक महिलांना दिलासा मिळाला आहे.14 जानेवारी म्हणजेच मकर संक्रातीपूर्वी हे तिन्ही हप्ते महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात. राज्यांत सुमारे 2 कोटी 42 लाख महिला या योजनेसाठी पात्र आहेत. मात्र आत्तापर्यंत केवळ सुमारे 1 कोटी 60 लाख महिलांनीच ई-केवायसी पूर्ण केल्याची माहिती महिला आणि बाल विकास विभागाकडून देण्यात आली आहे. उर्वरित महिलांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे. मकर संक्रांतीच्या गोडव्यासोबतच आर्थिक बळ देणारी ही बातमी सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत आहे. नवीन वर्षाच्या या पहिल्या महिन्यांत सरकारकडून मिळणारे वाण... हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. लवकर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवर खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज धडकणार आहे.

No comments