नव्या पिढीच्या आदर्श: लासुर येथील अठरा वर्षीय युवकाची निस्वार्थ तीर्थ सेवा. लासुर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) लासूर तालुका चोप...
नव्या पिढीच्या आदर्श: लासुर येथील अठरा वर्षीय युवकाची निस्वार्थ तीर्थ सेवा.
लासुर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लासूर तालुका चोपडा सध्या संगणकीय युग असून मोबाईल, इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे आजची पिढी सांप्रदायिक पंथाकडे अपेक्षेप्रमाणे वळताना दिसत नाही. अशा परिस्थितीत चोपडा तालुक्यातील लासूर येथील युवा मृंदगाचार्य ह.भ.प. रोहन महाराज यांनी लहान वयातच सांप्रदायिक परंपरेची कास धरून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. ह.भ.प. रोहन महाराज हे इयत्ता तिसरीपासूनच सांप्रदायिक पंथाकडे वळले. अध्यात्माची ओढ आणि भक्तीभाव मनात रुजवत त्यांनी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे जाऊन मृदुंग वादनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. आज ते आपल्या उत्कृष्ट मृदुंग वादनामुळे परिसरातच नव्हे तर जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील किर्तन सप्ताह, एकदिवसीय किर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये मृदुंग वाजवण्यासाठी आवर्जून बोलावले जातात. याशिवाय आदिशक्ती मुक्ताई तीर्थयात्रा परिवाराच्या माध्यमातून त्यांनी “ना नफा ना तोटा” या उद्देशाने जवळपास ५१ भाविकांना (मातृशक्तीला) अकरा दिवसांची तीर्थयात्रा घडवून आणली. विशेष म्हणजे चोपडा तालुक्यातील लासूरसारख्या गावामध्ये एवढ्या कमी वयात कुणीही तीर्थयात्रा काढलेली नसताना, मृंदगाचार्य ह.भ.प. रोहन महाराज (वय-१८) यांनी ही जबाबदारी ना नफा ना तोटा या तत्त्वावर यशस्वीपणे पार पाडली.
१) अत्यंत नियोजन पद्धतीने यात्रा सफल २) वेळेवर चहा ,नाश्ता , जेवणाची व्यवस्था ३) भाविकांना थांबण्यासाठी उत्तम व्यवस्था ४) प्रत्येक तीर्थस्थळी त्या तीर्थक्षेत्राची संपूर्ण माहिती साठी गाईड ५) प्रत्येक भाविकाची सुरक्षेला प्राधान्यक्रम ६) तीर्थक्षेत्रानुसार धार्मिक विधी साठी भाविकांना सहकार्य व महाराष्ट्र ,मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यात प्रवास करताना कोणताही त्रास झाला नाही. व्यवस्थित नियोजना मुळे प्रवास सुखरूप व आनंददायी ठरला. त्यांच्या या कार्यामुळे लहान वयात अध्यात्म, सेवा आणि सांप्रदायिक परंपरेचे जतन करणाऱ्या रोहन महाराजांचे सर्वत्र कौतुक होत असून ते आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.
प्रतिभा पवार,
चाळीसगाव,
एक तीर्थयात्री मातृ शक्ती

No comments