adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या बदलीबाबत हेमकांत गायकवाड यांनी केलेल्या तक्रारीची दखल विभागीय आयुक्तांचे कार्यवाही करण्याचे निर्देश

 अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या बदलीबाबत हेमकांत गायकवाड यांनी केलेल्या तक्रारीची दखल  विभागीय आयुक्तांचे कार्यवाही करण्याचे निर्देश...

 अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या बदलीबाबत हेमकांत गायकवाड यांनी केलेल्या तक्रारीची दखल 

विभागीय आयुक्तांचे कार्यवाही करण्याचे निर्देश  


जळगांव प्रतिनिधी

ऑल इंडिया ब्लू टायगर सेना व स्वराज्य राज्य पोलिस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे जळगांव जिल्हाध्यक्ष हेमकांत बळीराम गायकवाड यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव मंडळ येथील अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या बदलीबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने दिले आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून संबंधित पत्र सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नाशिक येथील मुख्य अभियंत्यांना पाठविण्यात आले आहे.

या प्रकरणी यापूर्वीही विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत विविध पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र,वारंवार तक्रार अर्ज सादर करूनही अपेक्षित कार्यवाही न झाल्याने संबंधित तक्रारदार पत्रकार हेमकांत बळीराम गायकवाड यांनी पुन्हा एकदा तक्रार अर्ज दाखल केला होता. तक्रार अर्जाचा विचार करून, सदर अर्जाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती अर्जदारास लेखी स्वरूपात कळवावी,तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत परस्पर अवगत करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त कार्यालयाने दिले आहेत.या संदर्भातील सर्व तक्रारी व अर्जांची प्रतही पत्रासोबत जोडण्यात आली आहे. दरम्यान, या आदेशामुळे सार्वजनिक बांधकाम विभागात प्रशासकीय हालचालींना वेग येणार असल्याचे संकेत मिळत असून, पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments