म्हसावदच्या थेपडे विद्यालयात जिजामाता व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटी...
म्हसावदच्या थेपडे विद्यालयात जिजामाता व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
म्हसावद:- येथील स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाची सविस्तर माहिती अशी की, जयंतीनिमित्त आयोजित या वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांतून जिजामाता आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य श्री. जी. डी. बच्छाव यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून त्यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले आणि महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववी 'अ' च्या विद्यार्थिनी वैभवी चव्हाण आणि कांचन पाटील यांनी अत्यंत बहारदार पद्धतीने केले. शेवटी, विद्यार्थिनी सृष्टी पाटील हिने आभार मानले

No comments