आदर्श शिक्षक प्रवीण वारके महाराष्ट्र रत्न सेवाकार्य पुरस्काराने सन्मानित इदू पिंजारी फैजपूर - (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथून...
आदर्श शिक्षक प्रवीण वारके महाराष्ट्र रत्न सेवाकार्य पुरस्काराने सन्मानित
इदू पिंजारी फैजपूर -
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथून जवळच असलेल्या न्हावी येथील शारदा माध्यमिक विद्यालयात कार्यरत असलेले उपशिक्षक प्रवीण मधुकर वारके यांना भुसावळ येथील अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था भुसावळ तर्फे महाराष्ट्र रत्न सेवाकार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना भुसावळच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.गायत्रीताई भंगाळे व सुमंगल अहिरे यांच्या हस्ते देण्यात आला. पुरस्कारामध्ये सन्मान पदक,एक भेटवस्तू ,शाल व संविधान प्रतिमा त्यांना देण्यात आली. त्यांना पुरस्कार शिक्षण, सामाजिक,धार्मिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मिळाला असून त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे.यापूर्वी त्यांना तापी-पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे.

No comments