adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल व सेमी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन व फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात संपन्न

सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल व सेमी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन व फॅन्सी ड्रेस स्पर्धा  उत्साहात संपन्न  भरत कोळी...

सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल व सेमी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन व फॅन्सी ड्रेस स्पर्धा  उत्साहात संपन्न 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल व सेमी इंग्लिश  मीडियम स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त   फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . शाळेचे अध्यक्ष डॉ . प्रदीप माहेश्वरी सर यांच्या अध्यक्षतेखाली व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .शीला तायडे मॅडम यांच्या उपस्थितीत प्रथम सकाळी ७:३० वा .शाळेचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप माहेश्वरी सर यांच्या हस्ते झेंड्याचे पूजन करून झेंडा फडकवण्यात आला .शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त फॅन्सी ड्रेस व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमांमध्ये वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, हस्तकला या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विश्वनाथ धनके सर गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती यावल व शाकीर शेख सर केंद्र प्रमुख यावल आणि श्री विजय मेढे सर माजी केंद्रप्रमुख यांचे प्रमुख उपस्थिती लाभली होती .प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ढोलताशांच्या गजरात करण्यात आले .फॅन्सी ड्रेस या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून संतोष वानखेडे सर व डॉक्टर नरेंद्र महाले सर, जागृती गरुड मॅडम व आदित्य गरुड यांचे उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाच्या सुरुवाती सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले .फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये इयत्ता नर्सरी ते ९ वी या वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता .यात विद्यार्थ्यांनी आपल्या देशातील महान व्यक्ती, स्त्रिया, शेतकरी इत्यादींचा अभिनय सादर केला होता.कार्यक्रमाच्या शेवटी विविध स्पर्धा व फॅन्सी ड्रेस स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रूपाली चौधरी मॅडम व भाग्यश्री सरोदे मॅडम यांनी केले तर मान्यवरांचे आभार अर्चना चौधरी मॅडम यांनी केले .

No comments