adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रामकृष्ण विजय बनसोडे यांची राष्ट्रीय मानव अधिकार महिला व बाल संरक्षण परिषदच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

 रामकृष्ण विजय बनसोडे यांची राष्ट्रीय मानव अधिकार महिला व बाल संरक्षण परिषदच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड   विश्राम तेले चौगाव :- (संपादक -:- हे...

 रामकृष्ण विजय बनसोडे यांची राष्ट्रीय मानव अधिकार महिला व बाल संरक्षण परिषदच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड  


विश्राम तेले चौगाव :-

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मु. रामेश्वर बु., तालुका अमळनेर येथील रहिवासी व सध्या नाशिक येथे वास्तव्यास असलेले रामकृष्ण विजय बनसोडे यांची राष्ट्रीय मानव अधिकार महिला व बाल संरक्षण परिषद या संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार व भ्रष्टाचार विरोधी संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, भ्रष्टाचार विरोधी मोर्चा (दिल्ली) उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या असून सामाजिक, मानव अधिकार व भ्रष्टाचार विरोधी क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान राहिले आहे.

आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय प्रजासत्ताक दिनी नाशिक येथील जलाराम मतिमंद मुलांची निवासी आश्रम शाळा येथे विद्यार्थ्यांना भोजनदान करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास यांनी त्यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र प्रदान केले आहे. त्यांचा कार्यकाळ दि. 21 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2027 असा राहणार आहे. या निवडीबद्दल राष्ट्रीय उपाध्यक्ष पद्मावती मॅडम, तेलंगणा राज्य अध्यक्ष ॲड. सरिता यादव, माधवी मॅडम (हैदराबाद) तसेच निशा भालेराव (नाशिक) आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments