adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

 प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन   प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) 26 जानेवारी प्रजासत्ताक द...

 प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन  


प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त वार्षिक पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आ. श्री एकनाथराव खडसे साहेब (विधान परिषद सदस्य) यांच्या हस्ते सहशालेय उपक्रम हरित सेनेअंतर्गत इकोकल्ब एक पेड माॅ के नाम, वृक्ष संवर्धन पर्यावरण पूरक कार्यक्रम, तंबाखू मुक्त शाळा - स्वच्छ शाळा सुंदर शाळा, गांधी तीर्थ गांधी फाउंडेशन द्वारा स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रम, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम या सर्व शालेय उपक्रम उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन शाळेसाठी मानांकन प्राप्त करून सन्मानपत्र प्राप्त करून दिल्याबद्दल शिवाजीराव भागवत वंजारी उपशिक्षक यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच इयत्ता 12 वी व 10 वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तसेच राज्यस्तरावर क्रीडा स्पर्धेत सहभागी विद्यार्थी व एनसीसी कॅडेट, आदर्श विद्यार्थी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर विद्यार्थी हस्तलिखित झेप पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवर यांच्याकडून करण्यात आले.


मान्यवरांकडून मनोगतात सर्वांगीण विकास या विषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे केंद्रीय क्रीडा युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे तसेच डाॅ.जगदीश पाटील सदस्य मराठी भाषा अभ्यास मंडळ बालभारती पुणे, तसेच मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आदरणीय अँड रोहिणीताई खडसे-खेवलकर, उपाध्यक्ष नारायणदादा चौधरी, सचिव डॉ.सी.एस.चौधरी संचालक मा.रमेश खाचणे, मा.पुरुषोत्तम महाजन, मा.महेश पाटील, मा.प्राचार्य व्ही.एम.चौधरीसर, उपप्राचार्या व्ही.के.शिर्के, पर्यवेक्षक व्ही.डी.बऱ्हाटे, के.आर.कवळे, एस.पी.राठोड, मुख्याध्यापक  आर.वाय.सोनवणे रुईखेडा, मुख्याध्यापिका चित्रा भारंबे  सौ.तु.ल.कोंळबे प्राथ., सांस्कृतिक मंडळ प्रमुख सौ.वाय.एस.पाटील, उपप्रमुख बी.एम.कोल्हे  सचिव व्ही.एस.राणे सर्व शिक्षक वृंद, सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सदर सदर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.डी.भोडळे मॅडम यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य व्ही. एम.चौधरी सर यांनी केले, प्रमुख पाहुण्यांचा परिचय एस. आर. ठाकूर सर यांनी केला, आभार प्रदर्शन सौ.वाय. एस. पाटील मॅडम यांनी केले. सत्कार समारंभा नंतर विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणदर्शन कार्यक्रमांचे बाल कलाकार यांच्याकडून सादरीकरण करण्यात आले. शेवटी वंन्दे मातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सौ.आर.व्ही.महाजन मॅडम यांच्याकडून सर्व उपस्थितीतांचे आभार व्यक्त करण्यात आले.


No comments