adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कलेतून वाहिली श्रद्धांजली: चित्रकार सुनील दाभाडे यांनी कुंचल्याच्या माध्यमातून साकारले अजितदादा पवार यांचे भावपूर्ण चित्र

 कलेतून वाहिली श्रद्धांजली: चित्रकार सुनील दाभाडे यांनी कुंचल्याच्या माध्यमातून साकारले ना.अजितदादा पवार यांचे भावपूर्ण चित्र  जळगांव प्रतिन...

 कलेतून वाहिली श्रद्धांजली: चित्रकार सुनील दाभाडे यांनी कुंचल्याच्या माध्यमातून साकारले ना.अजितदादा पवार यांचे भावपूर्ण चित्र 


जळगांव प्रतिनिधी -

(संपादक हेमकांत गायकवाड)

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असतानाच, जळगांव प्रसिद्ध चित्रकार सुनिल दाभाडे  (कलाशिक्षक मानव सेवा विद्यालय ) यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून त्यांना अनोखी आणि भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. दाभाडे यांनी आपल्या कुंचल्यातून  ना.अजितदादा पवार यांचे एक अत्यंत जिवंत आणि बोलके तैलचित्र (Portrait) रेखाटले असून, त्याद्वारे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत 

सुनिल दाभाडे हे त्यांच्या वास्तववादी (Realistic) चित्रशैलीसाठी ओळखले जातात. या चित्रात त्यांनी ना.अजितदादा  पवार यांच्या चेहऱ्यावरील  सात्विकता आणि त्यांचा साधेपणा हुबेहूब टिपला आहे. चित्र पाहताना ते प्रत्यक्ष समोर उभ्या आहेत, असा भास होतो. अत्यंत कमी वेळात आणि सूक्ष्म बारकाव्यांसह साकारलेले हे चित्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

कलेच्या माध्यमातून सांत्वनपर

 बोलताना सुनिल दाभाडे म्हणाले, " पवार कुटुंबियांवर कोसळलेला हा दुःखाचा डोंगर मोठा आहे. एका कलाकाराकडे शब्दांपेक्षा भावना व्यक्त करण्यासाठी चित्र हेच मोठे माध्यम असते. छत्र हरपण्याचे दुःख मोठे असते, म्हणूनच मी माझ्या कलेच्या माध्यमातून ना.अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. दाभाडे यांनी रेखाटलेले हे श्रद्धांजलीपर चित्र समोर आल्यानंतर राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे. दुःखाच्या या प्रसंगात आपल्या लाडक्या नेत्याला दिलेली ही कलात्मक मानवंदना अनेकांच्या मनाला स्पर्श करून गेली आहे. पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होतानाच, एका कलाकाराने आपल्या कौशल्यातून व्यक्त केलेली ही श्रद्धांजली खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरली आहे.

No comments