adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नवीन माध्यमिक विद्यालय निमखेडी खुर्द येथे पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

 नवीन माध्यमिक विद्यालय निमखेडी खुर्द येथे पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा  मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक ...

 नवीन माध्यमिक विद्यालय निमखेडी खुर्द येथे पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा 


मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

   निमखेडी खुर्द येथील नवीन माध्यमिक विद्यालय शुक्रवारी दिनांक 23 .1.2026 रोजी संध्याकाळी सात वाजता पारितोषिक वितरण व कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री चंद्रशेखर रामभाऊ बढे तसेच उद्घाटक संस्थेच्या चेअरमन एडवोकेट रोहिणी ताई खडसे -खेवलकर प्रमुख पाहुणे स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन श्री नारायण दादा चौधरी तसेच माजी मुख्याध्यापक माजी विद्यार्थी उद्योजक श्री चिंतामण सुभाष बेलदार, दीपक भाऊ साळुंखे, माळेगाव पोलीस पाटील सर्वेश्वर पाटील. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींनी इशस्तवन व स्वागत गीत म्हटले प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री एन पी भोंबे सर यांनी केले. सन 2024 25 याप्रसंगी विद्यालयातील गुणवंत व इयत्ता पाचवी ते दहावी प्रथम क्रमांक, आदर्श विद्यार्थी, सीआयएसएफ मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरव केला.

कार्यक्रम पाहण्यासाठी मुला मुलींचे सादरीकरण पाहण्यासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली व बक्षीस देऊन कौतुक केले. सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख श्री एच पी झोपे सर यांनी आभार मानले. कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

No comments