ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयात उत्साहात ध्वजारोहण चंद्रकांत पाटील विचखेडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शहरातील नारायणवाडी भागात असलेल्या ज...
ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयात उत्साहात ध्वजारोहण
चंद्रकांत पाटील विचखेडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शहरातील नारायणवाडी भागात असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी ८.१५ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. संघाचे अध्यक्ष श्री. जयदेव देशमुख यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर ध्वजवंदना करण्यात आली तसेच उपस्थितांनी सामूहिक राष्ट्रगीताचे गायन केले. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिकांसह मा. जी नगराध्यक्ष श्री. रमणलाल गुजराती, श्री. विश्वनाथ साळुंखे, श्री. विजय करोडपती, श्री. रमेश तात्या शिंदे, श्री. जिजाबराव नेर पगारे, श्री. गोविंदा बापू महाजन, श्री. श्याम भाई गुजराती, श्री. प्रमोद डोंगरे, श्री. संजय बजाज, श्री. दिलीपराव पाटील, श्री. परशुराम पेंढारकर, श्री. डी. आर. परदेशी, श्री. महाजन, सौ. नलिनीताई पाटील, श्री. मधुकर साळुंखे, श्री. हाफिज अली, श्री. एकनाथ पाटील, श्री. रामकृष्ण महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम शांततेत व देशभक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

No comments