adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कामगार कल्याण मंडळ कार्यालयात ध्वजारोहण

 कामगार कल्याण मंडळ कार्यालयात ध्वजारोहण  चंद्रकांत पाटील विचखेडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात ...

 कामगार कल्याण मंडळ कार्यालयात ध्वजारोहण 


चंद्रकांत पाटील विचखेडा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. राज्य परिवहन महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी श्री. जगतराव पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक श्री. बबन वाघ, श्री. संदीप देसले तसेच अकुलखेडा येथील श्री. प्रभाकर महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी ध्वजवंदना करून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रम साधेपणात व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

No comments