अंतुर्ली ता. मुक्ताईनगर येथे संगीतमय श्रीमद्ध भागवत कथा व अखंड हरीनाम साप्ताहाचे आयोजन मुक्ताईनगर प्रतिनिधी. किरण धायले (संपादक -:- ...
अंतुर्ली ता. मुक्ताईनगर येथे संगीतमय श्रीमद्ध भागवत कथा व अखंड हरीनाम साप्ताहाचे आयोजन
मुक्ताईनगर प्रतिनिधी. किरण धायले
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अंतुर्ली ता. मुक्ताईनगर येथे दरवर्षी प्रमाणे संगीतमय श्रीमद भागवत कथा व अखंड हरीनाम साप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. या साप्ताहचे आयोजन समस्त गावकरी मंडळी व समिती यांच्या पुढाकारणे आयोजन करण्यात येते.हे या साप्ताहचे ९ वे वर्ष आहे या कथेला प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज नगर अंतुर्ली येथे दि. १५/०१/२०२६. वार गुरुवार रोजी सुरवात होणार आहे.तर कथेची सांगता २२जानेवारी २०२६ ला होणार आहे या साप्ताहाचे कथा वाचक ह. भ. पारायण पंकज महाराज भानघुरेकर यांच्या अमृत वाणीतून... या साप्ताहाचे दैनंदिन कार्यक्रम काकडा आरती सकाळी ५ ते ६, भागवत कथा दुपारी १२ ते ४,हरिपाठ संध्याकाळी ५ ते ६, कीर्तन रात्री ८ ते १०, असे आहे. या सप्ताह काळात वेगवेगळ्या कीर्तनकारचे कीर्तन आहे.दि. १५ जानेवारी ह. भ. प. वैष्णवीताई सुशीर जामनेर यांचे कीर्तन तसेच दि. १६ जानेवारी ह. भ. प. लखन महाराज चिंचखेडा जामनेर, दि. १७ जानेवारी ह. भ. प. मनोहर देव महाराज अंतुर्ली मुक्ताईनगर, दि. १८ जानेवारी ह. भ.प.दीपक महाराज निंभोरासीम, दि. १९ जानेवारी ह. भ. प.दिलीप महाराज बेलाडकर मलकापूर यांचे कीर्तन, दि. २० जानेवारी ह. भ. प. सुरेखाताई महाराज शेगाव यांचे कीर्तन, दि.२१ जानेवारी ह. भ. प.मनोज महाराज एनगावकर यांचे कीर्तन आहे. या साप्ताहत मूर्दंग वादक हरी भक्त किरण महाराज धामदेकर,ऑरगणवादक अमोल महाराज अहिल्यानगर, ऑकटोपेड रितेश पाटील थेरोडा,गायक भागवत महाराज रींगन पुणे, गायणाचार्य ह. भ. प. रातीराम महाराज खामखेडा,ह. भ. प.मांगीलाल महाराज भानगुरा,ह. भ. प. कल्पेश महाराज परागिरी, असे आहे.या साप्ताहाचे कल्याचे कीर्तन दि. २२ जानेवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह. भ. प. रवींद्र हरणे महाराज मुक्ताईनगर यांचे आहे. तसेच महाप्रसाद १२ ते 3 या वेळेत तर दिंडी सोहळा संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत आहे.या साप्ताहाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. राम कृष्ण हरी


No comments