adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राहुल कोल्हे सामाजिक मित्र परिवाराचा विशेष उपक्रम-- पिंपरूड येथे पत्रकारांचा सन्मान व दिव्यांगांना साहित्य वितरणासह रक्ततपासणी शिबीर

  राहुल कोल्हे सामाजिक मित्र परिवाराचा विशेष उपक्रम-- पिंपरूड येथे पत्रकारांचा सन्मान व दिव्यांगांना साहित्य वितरणासह रक्ततपासणी शिबीर  इदू ...

 राहुल कोल्हे सामाजिक मित्र परिवाराचा विशेष उपक्रम--

पिंपरूड येथे पत्रकारांचा सन्मान व दिव्यांगांना साहित्य वितरणासह रक्ततपासणी शिबीर 


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 फैजपूर येथून जवळच असलेल्या पिंपरूड येथे दिव्यांग व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या ( राहुल कोल्हे सामाजिक मित्र परिवार ) वतीने दरवर्षी प्रमाणे राष्ट्रीय युवा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बाळशास्त्री जांभेकर, स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंती निमित्ताने पत्रकार बांधवांचा सन्मान तसेच अधिकारी यांना दिव्यांग मित्र म्हणून सन्मान रक्त तपासणी शिबीर घेऊन करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रांतधिकारी बबनराव काकडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून दिव्यांग मंडळ अध्यक्ष डॉ. मारोती पोटे तर डाएटचे अधिव्याख्याता प्रा. शैलेश पाटील, राज्य कर सहाय्यक आयुक्त डाळींबी ताई सरोदे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते द्विपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आले. यावेळी तलाठी श्वेता ससाने,  ग्रामसेवक बाळु वायकोळे, सहा. महसूल अधिकारी सेखावत तडवी, सहा. प्रकल्प अधिकारी प्रवीण सपकाळे, वकिल राकेश पाटील, से.नि. पोलीस उपआयुक्त दिलीप सूर्यवंशी यांनी सुद्धा भेट दिली. यावेळी अशोक कोळी, विनोद बिऱ्हाडे, कमल बेलसरे या दिव्यांग बांधवाना ब्लॅंकेट, विष्णू साळवे यांना ड्रेस व ब्लॅंकेट दिले. त्यांच्या मुलांना केयूर महाजन, मेहुल पाटील, ज्ञानेश्वर  कोळी यांना स्कुल बॅग,ऑनलाईन रेशन कार्ड, सं.यो.मंजुरीचे पत्र दिले. तसेच सुवासिनी चौधरी ९५ % ब्लाइंड असून यांनी भागवत कथेतील १८ अध्याय  तोंडी वाचन केल्याबद्दल त्यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार बांधव  वासुदेव सरोदे लोकमत, उमाकांत पाटील खान्देश लाईव्ह न्युज, समीर तडवी सकाळ, प्रा. राजेंद्र तायडे नवराष्ट्र, योगेश सोनवणे पुण्य नगरी,फारुख शेख लोकशाही, सलीम पिंजारी स्वतंत्र लोकशाही, मलक शाकीर देशोन्नती, तथा जनता की बात, शेखर पटेल यावल न्यूज, संजय सराफ तरुण भारत, राजू तडवी लोकमत समाचार, मयूर मेढे पुण्य प्रताप, ईदू पिंजारी  नेशन महाराष्ट्र,अरुण होले देशदूत, या पत्रकार बंधूना सन्मानचिन्ह, मेडल, पेन व शाल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला. यावेळी यावल ग्रामीण रुग्णालयाचे आय. सी. टी. सी विभाग प्रमुख वसंत कुमार सदानशिव, रवींद्र माळी, मिलिंद राणे यांनी रक्त तपासणी केली. पोलीस पाटील हरीश चौधरी, नितीन जंगले हे सुद्धा उपस्थिती होत. जळगाव येथे २०२६ राज्यस्तरीय दिव्यांग वधू-वर  परिचय मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी राहुल कोल्हे ९४०५९१८५०३ व योगेश चौधरी ९३७३०८४००५  यांच्या कडे फार्म भरून लवकरात लवकर जमा करावे असे आवाहन दिव्यांग संस्थेतर्फे करण्यात आले. सूत्रसंचालन संजय सराफ तर आभार संस्थेचे अध्यक्ष मुन्ना चौधरी यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मार्गदर्शक राहुल कोल्हे, उपाध्यक्ष चेतन तळेले, सचिव विशाल दांडगे, चिराग पाटील, पराग वारके, भगवान कोळी,सोनू कोळी,यांनी परिश्रम घेतले. या वेळी दिव्यांग बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्वांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला.

No comments