adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गोकुळ महिला सांस्कृतिक मंडळाचा 'हळदी-कुंकू' सोहळा उत्साहात संपन्न

 गोकुळ महिला सांस्कृतिक मंडळाचा 'हळदी-कुंकू' सोहळा उत्साहात संपन्न  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शेगाव:- येथील...

 गोकुळ महिला सांस्कृतिक मंडळाचा 'हळदी-कुंकू' सोहळा उत्साहात संपन्न 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शेगाव:- येथील गोकुळ महिला सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि विविध मनोरंजनात्मक उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली.


मान्यवरांचा सत्कार कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे शेगावच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. सुषमा राजेंद्र भिसे आणि सौ. ढगे ताई यांची उपस्थिती. मंडळाचे अध्यक्ष सौ. मंजिरी गजानन जोशी ,सचिव स्वाती प्रवीण शिंदे व गोकुळ सांस्कृतिक महिला मंडळ यांच्या हस्ते दोन्ही नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा महिला मोर्चा सोसलं मिडिया संयोजिका सौ चेतना गजानन खेते यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे स्वरूप मंडळातील २६ महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेऊन या हळदी-कुंकू समारंभात सहभाग नोंदवला.महिलांसाठी मनोरंजन छोट्या गमतीदार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सध्याच्या ट्रेंडनुसार महिलांनी उत्साहाने Reels बनवून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.पल्लवी दिनेश अस्वार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सौ. सुलभाताई सुनील वानखेडे यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या अध्यक्षा सौ. मंजिरी गजानन जोशी आणि सचिव सौ. स्वातीताई प्रवीण शिंदे व गोकुळ सांस्कृतिक मंडळाने विशेष परिश्रम घेतले. महिलांच्या एकीचे आणि उत्साहाचे दर्शन या निमित्ताने घडले. 


No comments