अन् काय ते खड्डे, अन् काय ती उडणारी धुळ अन् काय तो सोनवद बाभुळगाव रस्ता सोनवद बाभुळगाव रस्तावर खड्ड्यांमुळे एक निष्पाप तरुणाचा बळी सोनवद ब...
अन् काय ते खड्डे, अन् काय ती उडणारी धुळ अन् काय तो सोनवद बाभुळगाव रस्ता
सोनवद बाभुळगाव रस्तावर खड्ड्यांमुळे एक निष्पाप तरुणाचा बळी
सोनवद बाभूळगाव रस्त्याला अतिक्रमणाचा विळखा
विकास पाटील धरणगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव : तालुक्यातील सोनवद बाभुळगाव रस्त्याचे अतिशय बिकट अवस्था ही झालेली आहे. या रस्त्याला रोज शंभर ते दीडशे वाहनांची दिवसभर वर्दळ हे सुरू असते. या रस्त्याचा शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल हा मिळत असतो परंतु शासनाला महसूल देणाऱ्या रस्त्याची मोठी दूरावस्था ही सध्या झालेली आहे. चमगाव व बाभूळगाव येथून शासनाने वीटभट्ट्यांसाठी माती उत्खननाचे परवाने हे दिलेले असतात. परंतु सोनवद ते बाभुळगाव या रस्त्यावर खूप मोठ मोठी खड्डे पडलेली आहेत पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असून वाहन धारकांना खड्ड्यांचे अंदाज न आल्यामुळे बरेच छोटे-मोठे अपघात हे घडलेले आहेत. 12 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास बाभुळगाव येथील दोन तरुण बांभोरी येथील केबी एक्स कंपनीमध्ये कामाला जात असताना सोनवद गावाजवळ रस्त्याने जात असलेल्या मातीच्या भरलेले ट्रॅक्टर व मोटारसायकल यांच्यात मोठा अपघात झाला अपघात एवढा भीषण होती की यात एकनाथ दयाराम मराठे वय 22 वर्ष या तरुणाच्या दुर्दैवाने जागीच मृत्यु झाला. मयत एकनाथ हा एकुलता एक मुलगा होता काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे तो त्याच्या आई सोबत बाभुळगाव येथे मामांच्या गावी वास्तव्यास होता घरातील कर्ता मुलगा गेल्यामुळे परिवारावर दुःखाच्या डोंगर कोसळलेला आहे. या अपघातामुळे संपूर्ण गावावर शोककडा पसरली आहे.
एवढा मोठा अपघात होऊनही संबंधित विभागाला जाग आलेली नाही. या रस्त्यामुळे अजून अपघात होण्याची वाट संबंधित विभाग बघत तर नाही ना असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. सोनवद ते बाभूळगाव या रस्त्यावर बाभूळगाव , चमगाव, अहिरे या तीन गावांना धरणगाव जाण्यासाठी या रस्त्यावरून नेहमी प्रवास करावा लागतो. या रस्त्यावर सोनवद ते अहिरे दरम्यान 25 ते 30 विट भट्ट्या आहेत या विट भट्ट्यांनी रस्त्यावर मोठे अतिक्रमण केलेली आहेत तसेच या रस्त्यावर मोठी वर्दळ असल्यामुळे असलेल्या अतिक्रमण हटवून रस्त्याचे रुंदीकरण करावे व रस्ता रहदारीस मोकळा करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केलेली आहे संबंधित विभाग याबाबत काय कार्यवाही करते याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून आहे. हा रस्ता सध्या मृत्यूच्या सापळा बनलेला आहे संबंधित विभागाने लवकरात लवकर रस्त्याच्या नवीन डांबरीकरणाला सुरुवात करावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे. माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेबांनी बाभुळगाव ते सोनवद या रस्त्याच्या प्रश्न लक्ष घालून मार्गी लावावा अशी मागणी बाभूळगाव चमगाव अहिरे येथील नागरिकांनी मा. ना. गुलाबरावजी पाटील साहेबांकडे केलेली आहे.

No comments