राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर उत्साहात चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. ...
राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर उत्साहात
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी पाटील महाविद्यालय चोपडा येथील राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन भाऊसो. शामराव शिवराम पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चहार्डी, तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथे दिनांक 18जानेवारी 2026 ते 24 जानेवारी 2026 या दरम्यान करण्यात आले. या शिबिरासाठी मा. भैयासाहेब ॲड. संदीप सुरेश पाटील अध्यक्ष, महात्मा गांधी शिक्षण मंडळ चोपडा, व ताईसो स्मिता संदीप पाटील सचिव, महात्मा गांधी शिक्षण मंडळ चोपडा यांनी शुभेच्छा दिल्या. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून मा. श्री. डॉ. सुरेश शामराव पाटील अध्यक्ष, विद्या प्रसारक मंडळ, चहार्डी, उद्घाटक म्हणून मा. श्री प्रवीण बन्सीलाल पाटील माजी सैनिक चहार्डी, मा. डॉ.श्री. पराग पाटील उपाध्यक्ष, चहार्डी विद्या प्रसारक मंडळ चहार्डी, मा श्री.प्रकाश पाटिल सचिव, चहार्डी विद्या प्रसारक मंडळ, चहार्डी, श्री. गोविंदा महाजन सदस्य, कार्यकारी मंडळ म.गां.शि. मं. चोपडा , मा. श्री. जी. टी.पाटिल संचालक, चहाडी विद्या प्रसारक मंडळ, चहाडी , मा. श्री. निलेश पाटील, श्री. ज्ञानेश्वर पाटील उपसरपंच, ग्रामपंचायत चहार्डी, मा. जीवन महाजन पोलीस पाटील चहार्डी, श्री. पंकज पाटील प्राचार्य शा.शी उ.मा.वि. चहार्डी मा.श्री जीवन महाजन, श्री.विजय सोनवणे माजी प्राचार्य शा.शी उ.मा.वि. चहार्डी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.के.एन. सोनवणे, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.एस.ए.वाघ उपस्थित होते.
या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी सुरुवातीला दीपप्रज्वलन करून राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वर्गीय दादासाहेब डॉ.सुरेश जी पाटील व स्वर्गीय आक्कासाहेब शरदचंद्रिका सुरेश पाटील यांच्या प्रतिमेस माल्यार्पण कऱण्यात आले. मान्यवरांच्या स्वागतासाठी राष्ट्रीय सेवा योजनेमधील जागृती बारी, कांचन शंभरकर,व प्रतीक्षा महाजन या स्वयंसेवीकेंनी स्वागतगीत सादर केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक श्री विशाल पी. हौसे यांनी केले. येणाऱ्या सात दिवसातील कार्यक्रमाच्या नियोजनाचा आराखडा त्यांनी आपल्या प्रास्ताविकेतून सादर केला. डॉ. के.एन. सोनवणे यांनी रासेयो स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या तसेच हिवाळी श्रमसंस्कार शिबिर हे विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी असून या संधीचे सोन करून स्वयंसेवकांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा पर्यायी देशाचा विकास होइल अस मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत मा. श्री. डॉ. सुरेश शामराव पाटील यांनी केले. शिबिराच्या माध्यमातून समाज विकास व स्वविकास साधावा असे त्यांनी स्वयंसेवकांना आवाहन केले. या उद्घाटन कार्यक्रमाला मा. भाऊसो शामराव शिवराम पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चहार्डी येथील माननीय प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी वृंद यांचे सहकार्य मिळाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रमाधिकारी सौ. एस. बी. पाटिल यांनी तर आभार डॉ. के. डी. गायकवाड यांनी केले.

No comments