देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपुर्वी शहरातील पुतळा परिसराचे सौंदर्यीकरणाची आदी कामे करण्याची मागणी :-प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल...
देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपुर्वी शहरातील पुतळा परिसराचे सौंदर्यीकरणाची आदी कामे करण्याची मागणी :-प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपुर्वी शहरातील पुतळा व पुतळा परिसराचे सौंदर्यीकरणासह आदी कामे करण्यात यावी,अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी न.प. मुख्याधिकारी व न.प. नगराध्यक्ष यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, मलकापूर नगरीला इतिहास असून विदर्भाच्या प्रवेशद्वारी मलकापूर शहरामध्ये देशगौरव सुभाषचंद्र बोस यांची अखेरची सभा झालेली आहे. अशा या महान स्वातंत्र्य सेनानी देशगौरव सुभाषचंद्र बोस यांचे स्मारक तहसील चौक परिसरामध्ये काही वर्षांपुर्वी उभारण्यात आलेले आहे. येत्या २३ जानेवारी रोजी देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असून तहसील चौकस्थित त्यांच्या स्मारक परिसरामध्ये अनेक सौंदर्यीकरणाची कामांसह आवश्यक ती कामे करणे गरजेचे आहे. त्या बरोबरच या स्मारकाची रंगरंगोटी सुध्दा करणे आवश्यक झाले आहे. तेव्हा जयंतीपुर्वी देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे तसेच स्मारक व परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी मागणी अजय टप यांनी केली आहे.

No comments