adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हुतात्मा पुंडलिक मराठा सार्वजनिक वाचनालय परिसरात घाणीचे साम्राज्य स्वातंत्र्यसैनिक स्मारकाजवळ मद्याच्या बाटल्या; २६ जानेवारीपूर्वी स्वच्छतेची मागणी

हुतात्मा पुंडलिक मराठा सार्वजनिक वाचनालय परिसरात घाणीचे साम्राज्य स्वातंत्र्यसैनिक स्मारकाजवळ मद्याच्या बाटल्या; २६ जानेवारीपूर्वी स्वच्छतेच...

हुतात्मा पुंडलिक मराठा सार्वजनिक वाचनालय परिसरात घाणीचे साम्राज्य

स्वातंत्र्यसैनिक स्मारकाजवळ मद्याच्या बाटल्या; २६ जानेवारीपूर्वी स्वच्छतेची मागणी


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड) 

विदर्भाच्या प्रवेशद्वारी असलेल्या मलकापूर शहरातील नगर परिषद हद्दीत हुतात्मा पुंडलिक मराठा सार्वजनिक वाचनालय तसेच भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील शूर स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून नशायुक्त व्यसनांच्या बाटल्यांचा सडा पडलेला आढळून येत आहे. ज्ञानार्जन व संस्कृतीचे प्रतीक असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या तसेच देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकाजवळ अशी अवस्था असणे, ही बाब शहराच्या प्रतिमेला काळिमा फासणारी असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

या परिसरात नियमित साफसफाई होत नसल्याने दुर्गंधी, अस्वच्छता व असामाजिक घटकांचा वावर वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
लवकरच २६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन साजरा होणार असून, या पार्श्वभूमीवर तरी नगर परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संपूर्ण परिसराची साफसफाई करून घाणीची विल्हेवाट लावावी, मद्याच्या बाटल्या व कचरा हटवावा तसेच नियमित स्वच्छतेची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी शहरवासीयांकडून होत आहे. या प्रकरणाकडे नगर परिषद मुख्याधिकारी लक्ष देतील काय? आणि प्रजासत्ताक दिनापूर्वी शहराच्या प्रवेशद्वारावरील हा विद्रूप प्रकार दूर केला जाईल काय, याकडे संपूर्ण मलकापूर शहराचे लक्ष लागून आहे.

No comments