वैजापूर येथे आदिवासी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी उद्योग मार्गदर्शन शिबीर संपन्न चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दिना...
वैजापूर येथे आदिवासी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी उद्योग मार्गदर्शन शिबीर संपन्न
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दिनांक १७/०१/२०२५ रोजी ग्राम वैजापूर येथे आदिवासी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून फूड प्रोसेसिंग व शिलाई मशीन प्रशिक्षण तसेच मुख्यमंत्री उद्योग बँक कर्ज योजनेअंतर्गत मार्गदर्शन शिबीर यशस्वीरीत्या पार पडले.
या शिबिरात विष्णूपूर, वराड, कर्जाणे, खाऱ्यापाडा, मेलाणे, जिरायत पाडा (आडगाव), चौगाव, भारडू, तावसे, वडती, विरवाडे, संनपुले, अडावद व आंबाडे आदी गावांतील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती सहभागी झाले होते.
शिबिरात स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी उपलब्ध विविध बँक कर्ज योजना, शासनाच्या अनुदान योजना, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, योग्य व्यवसाय निवड, प्रशिक्षण सुविधा तसेच बँकांशी समन्वय याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनामुळे सहभागी युवक-युवतींना स्वावलंबनाची दिशा मिळाली असून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
या कार्यक्रमास उद्योग निरीक्षक श्री. लासुरकर सर, श्री. विजय सैदाने, कार्यक्रम आयोजक जिल्हा उद्योग केंद्र जळगाव, प्रणिता पावरा (सेंटर मॅनेजर, वित्तीय साक्षरता केंद्र चोपडा), सुनील भिल (सेंटर मॅनेजर, वित्तीय साक्षरता केंद्र अमळनेर) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कर्जाणे येथील उपसरपंच प्रमोद बारेला, विष्णूपूरचे सरपंच जगदीश भिल, नामा पावरा, आदिवासी सामाजिक कार्यकर्ते राकेश बारेला आदी मान्यवरांनी आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.
सदर शिबिरामुळे आदिवासी भागातील युवक-युवतींना उद्योगाच्या नव्या संधी उपलब्ध होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मोलाची मदत मिळाली आहे.

No comments