शाश्वत शेती हा भावी पीढयासांठी उत्पादकता टिकवण्याचा सर्वोत्तम पर्याय : डॉ. अरविंद भंडारे पारोळा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शाश...
शाश्वत शेती हा भावी पीढयासांठी उत्पादकता टिकवण्याचा सर्वोत्तम पर्याय : डॉ. अरविंद भंडारे
पारोळा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शाश्वत आर्थिक विकासात शेतीचे महत्त्व हे अन्नसुरक्षा, रोजगार निर्मिती, कच्च्या मालाचा पुरवठा आणि परकीय चलन मिळवून देण्यामध्ये आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि नैसर्गिक संसाधनांचा वापर करणे, ग्रामीण समुदायांना आर्थिक स्थिरता देणे हा शाश्वत शेतीचा केंद्रबिंदू असुन ज्यामुळे भविष्यातील पिढ्यांसाठीही शेतीची उत्पादकता टिकून राहण्यास मदत होणार असल्याचे मत डॉ. अरविंद भंडारे यांनी व्यक्तकेले. शाश्वत शेतीमुळे जमिनीची सुपीकता टिकते, पाणी व्यवस्थापन सुधारते आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते, ज्यामुळे एकात्मिक विकास साधला जातो अशी पुष्ठीही त्यांनी जोडली. मोंढाळे येथे किसान महाविद्यालयातील रासेयो एकक आयोजित हिवाळी श्रमसंस्कार शिबिरातील दुपारच्या मार्गदर्शनपर सत्रात शाश्वत आर्थिक विकासात शेतीचे महत्त्व या नियोजित विषयावरील प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. सत्राअध्यक्ष म्हणून महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. सविता चौधरी होत्या. सकाळच्या सत्रात डॉ. एस. बी. चौधरी यांनी सहजयोग आणि ध्यानधारणाचे फायदे यावर तर मुख्याध्यापिका वैशाली बोरसे यांनी एकाग्रता आणि चिंतन यावर विषयावर स्वयंसेवकांशी हितगुज साधले. त्यानंतर स्वयंसेवकांनी मोंढाळे येथील जि. प. मराठी शाळेच्या प्रांगणातील साफसफाई करून झाडझुडपांचे सुशोभिकरण केले. संध्याकाळच्या सत्रात जीवन मोरे यांनी कलेतून शाश्वत विकास या विषयावर मार्गदर्शन करतांना कलेतून शाश्वत विकास म्हणजे कलेचा वापर करून पर्यावरण, समाज आणि अर्थव्यवस्थेचा समतोल साधता येण्यासंदर्भात विचार मांडलेत तर तामसवाडी प्रा. आ. केंद्राच्या आरोग्य सेविका जया भंडारे यांनी सिकलसेल मुक्त महाराष्ट्र राज्य अभियानांतर्गत संदर्भात जागृतीपर आवाहन केले. सुत्रसंचालन कोमल पाटील तर आभार रोशनी पाटील या स्वयंसेविकांनी केले. राजु केदार आणि प्रविण वाघ सहकार्य केले.

No comments