adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जवान अभिजीत संजय माने यांना मध्य प्रदेश मध्ये वीरमरण, भोसे,कुमठे,कोरेगांव तालुका शोक सागरात बुडाला !

 जवान अभिजीत संजय माने यांना मध्य प्रदेश मध्ये वीरमरण, भोसे,कुमठे,कोरेगांव तालुका शोक सागरात बुडाला !   (सातारा जिल्हा) संभाजी पुरीगोसावी (स...

 जवान अभिजीत संजय माने यांना मध्य प्रदेश मध्ये वीरमरण, भोसे,कुमठे,कोरेगांव तालुका शोक सागरात बुडाला ! 


 (सातारा जिल्हा) संभाजी पुरीगोसावी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 कोरेगांव भोंसे येथील भारतीय सैन्य दलातील कार्यरत असणारे जवान अभिजीत संजय माने (वय 32) यांना उत्तर प्रदेशातील बबिना येथे कर्तव्यावर असताना हृदयविकारांच्या तीव्र धक्क्याने वीरमरण प्राप्त झाले ही दुर्दैवी घटना सोमवारी समोर आली‌. त्यांच्या या अकाली निधनामुळे भोसे,कुमठे गावासह परिसर शोक सागरात बुडाला आहे. जवान अभिजीत माने यांच्या पार्थिंवावर मंगळवारी शासकीय मानवंदना देवुन त्यांना जड अंतकरणाने अखेरचा निरोप देण्यात आला. अभिजीत माने हे 2013 साली भारतीय सैन्य दलात भरती झाले होते ते हवालदार पदावर कार्यरत होते. सोमवारी कर्तव्यावर परेडसाठी दाखल झाले होते. त्यावेळी त्यांना हृदयविकारांचा तीव्र धक्का बसला या त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिस्तप्रिय कर्तव्यनिष्ठ आणि मनमिळाव स्वभावाचे जवान म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण पाडळी (ता. सातारा) येथे झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण कोरेगांव डी.पी भोसले महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी थेट सैन्याचा मार्ग स्वीकारत देशाच्या संरक्षणासाठी स्वतःला वाहून घेतले होते. त्यांच्या पश्चांत आई वडील पत्नी लहान मुलगा व बहिण असा परिवार आहे. घरांतील कर्ता पुरुष काळाने हिरावून नेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

No comments