आदिवासी महासंमेलनात आरोग्य सेविका संगीता पावरा यांचे सिकलसेल अनिमिया निर्मूलनासाठी आवाहन.... आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनात सिकलसेल रक्...
आदिवासी महासंमेलनात आरोग्य सेविका संगीता पावरा यांचे सिकलसेल अनिमिया निर्मूलनासाठी आवाहन....
धुळे प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भारतातील आदिवासी समाजाचा सामाजिक एकता दाखवणारा ३३ वा आदिवासी सांस्कृतीक एकता महासंमेलन चैनपुरा ता.नेपानगर जि.बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथे दि. १३,१४,१५ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आला होता. या महासंमेलनात २२ राज्यातील अडीच लाख लोकांनी हजेरी लावली होती. महाराष्ट्रात सार्वजनिक विभाग महाराष्ट्र शासन अरुणोदय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन अभियान १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येणार असून या अभियानाकरिता महाराष्ट्रातील आदिवासी समाजासाठी बोलीभाषेतून श्रीमती.संगीता यशवंत पावरा (आरोग्य सेविका-आरोग्यवर्धिनी उपकेंद्र बाम्हणे, ता.शिंदखेडा जि. धुळे यांनी सिकलसेल रक्तविकाराबाबत जनजागृती करत सर्वांनी एकत्र येऊन सिकलसेल अनिमिया मुक्त समाजासाठी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन केले.


No comments