निवडणुकीच्या रणधुमाळीत रक्तरंजित राजकारण..! शिवसेना उमेदवार सुवर्णा जाधव यांच्या मुलावर जीवघेणा हल्ला..प्रभाग १५ मध्ये दहशत..! सचिन मोकळ...
निवडणुकीच्या रणधुमाळीत रक्तरंजित राजकारण..! शिवसेना उमेदवार सुवर्णा जाधव यांच्या मुलावर जीवघेणा हल्ला..प्रभाग १५ मध्ये दहशत..!
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.१४):- शहरातील प्रभाग क्रमांक १५ मध्ये राजकीय वातावरण तापले असतानाच शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार व माजी नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,ही घटना प्रभाग क्रमांक १५ च्या हद्दीत घडली असून राजकीय वादातूनच हा हल्ला करण्यात आल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे.हल्ल्यात जाधव यांच्या मुलाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.दरम्यान,हा हल्ला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.तसेच,लोकशाही प्रक्रियेत हिंसेला कोणतेही स्थान नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. या घटनेमुळे अहिल्यानगर शहरातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून आगामी निवडणुकीदरम्यान सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.पोलीस तपासातून नेमका हल्ल्याचा हेतू आणि आरोपींची ओळख लवकरच स्पष्ट होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

No comments