भारतीयांच्या जीवनात रंग भरणाऱ्या संविधानावर चिमुकल्यांनी भरले रंग चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:- "घर घर संविधान...
भारतीयांच्या जीवनात रंग भरणाऱ्या संविधानावर चिमुकल्यांनी भरले रंग
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:- "घर घर संविधान" या २६ नोव्हेंबर २०२५ ते २६ जानेवारी २०२६ कालावधीतील उपक्रमाच्या अनुषंगाने अनुदानित आदिवासी आश्रमशाळा सनपूले ता.चोपडा येथील ४० विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला. संविधानावर आधारित असलेल्या विविध चित्रांमध्ये आपल्या कलेतून विद्यार्थ्यांनी रेखाटन व रंग भरण्याचे कार्य केले.
इयत्ता पहिली ते बारावीत शिकणारे एकूण ४० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत स्वतःहून सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे उद्घाटन माध्यमिक मुख्याध्यापक नितीन पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी मिलिंद पाटील,अशोक महाजन,गजानन पाटील,अश्विनी पवार,अविनाश कचरे,लक्ष्मण अहिरे, विष्णू कोळी,भूषण पाटील यांची उपस्थिती होती.
संविधानातील विविध मूल्ये, समता,न्याय,संसद, न्यायपालि तसेच लोकशाही याबद्दलची विविध चित्रे मुलांनी यावेळी काढली.
त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे म्हणून ही चित्रकला स्पर्धा आयोजित केल्याची भावना मिलिंद पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

No comments