भीम आर्मी भारत एकता मिशन जळगाव जिल्हा आमरण उपोषणाबाबत निवेदन व आवाहन चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भीम आर्मी भारत एकता मिशन...
भीम आर्मी भारत एकता मिशन जळगाव जिल्हा आमरण उपोषणाबाबत निवेदन व आवाहन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भीम आर्मी भारत एकता मिशन, जळगाव जिल्हा अध्यक्ष मा. गणेश भाऊ सपकाळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल जयकर, तालुका अध्यक्ष श्री. मुबारक तडवी यांच्या नेतृत्वाखाली चोपडा तालुक्यातील कठोरा गावातील घरकुल लाभार्थ्यांना जागावाटप या अत्यंत जिव्हाळ्याच्या व न्याय्य मागणीसाठी वेळोवेळी ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच जिल्हा पातळीवर लेखी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. मात्र, ग्रामपंचायतीकडून नेहमीप्रमाणे या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले असून, अद्यापही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे कठोरा गावातील गरजू, वंचित व आदिवासी भिल्ल समाजातील नागरिकांवर मोठा अन्याय होत आहे.
या गंभीर बाबींची दखल प्रशासनाने न घेतल्यास, दि. 26 जानेवारी रोजी पंचायत समिती कार्यालय, चोपडा येथे भीम आर्मीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे हे आमरण उपोषण शंभर टक्के निश्चित असून, मागण्या मान्य होईपर्यंत कोणतीही माघार घेतली जाणार नाही. या प्रकरणात जर कोणतीही कारवाई झाली नाही, तर त्यास संबंधित ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व वरिष्ठ अधिकारी पूर्णतः जबाबदार राहतील, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. तसेच,तमाम आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, आदिवासी समाजातील बांधव, तसेच भीम आर्मीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नम्र आवाहन आहे की, या आमरण उपोषणाला प्रत्यक्ष भेट देऊन आमचे मनोबल वाढवावे व या अन्यायाविरुद्धच्या लढ्यात आम्हाला सक्रिय पाठिंबा द्यावा.
शांतीतून क्रांती न्यायासाठी लढा अखंड सुरू राहील..
हम हमारा हक्क मागते ना किसीसे भीक मागते..
आयु. राहुल मंगलाबाई लक्ष्मण जयकर ( भीम आर्मी भारत एकता मिशन जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ) 9665872391/8983343489

No comments