adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जिल्हा परिषद शाळा साळशिंगीला माजी विद्यार्थी प्रकाश सोनवणे यांच्याकडून दोन लाख ५१ हजार रुपयांचे साहित्य भेट

 जिल्हा परिषद शाळा साळशिंगीला माजी विद्यार्थी प्रकाश सोनवणे यांच्याकडून दोन लाख ५१ हजार रुपयांचे साहित्य भेट  इदू पिंजारी फैजपूर -  (संपादक ...

 जिल्हा परिषद शाळा साळशिंगीला माजी विद्यार्थी प्रकाश सोनवणे यांच्याकडून दोन लाख ५१ हजार रुपयांचे साहित्य भेट 


इदू पिंजारी फैजपूर - 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

बोदवड तालुक्यातील साळशिंगी जिल्हा परिषद शाळेत देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंडित भिल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रसंगी शाळेचे गावचे दानशूर व्यक्तिमत्व प्रकाश  सदाशिव सोनवणे माजी विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा साळशिंगी तथा संचालक चेअरमन लाईफान लॅबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्यातर्फे कै. सदाशिव सखाराम सोनवणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ शाळेला दोन लाख ५१ हजार रुपयांची साहित्य भेट देण्यात आले. यामध्ये गोदरेज कपाट पाच नग, आहुजा साऊंड सिस्टिम, बँड साहित्य, खुर्च्या २३ नग, टेबल एक नग, स्टेज पडदे दोन, महापुरुष फोटो २२ नग, आर ओ सिस्टीम व शाळेच्या  रंगरंगोटी साठी लागणारे  साहित्य असे एकूण दोन लाख ५१ हजार रुपयांचे साहित्य शाळेला भेट देण्यात आले.

प्रसंगी त्यांच्या मातोश्री श्रीमती शोभाताई सदाशिव सोनवणे यांचे शाळेतर्फे  जंगी स्वागत करण्यात आले.भविष्यामध्ये अजून भरीव मदत करण्यात येईल असे मनोगत ताईने आपल्या भाषणामध्ये व्यक्त केले.प्रसंगी सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका पठार मॅडम व सर्व शिक्षक बंधू भगिनी व गावकरी मोठ्या संख्येने  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इमाम गवळी सर यांनी केले. आभार प्रदर्शन महाजन सर यांनी केले. ग्रामपंचायत तर्फे सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

No comments