adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दुचाकी थांबली…आणि क्षणात उघडकीस आलं मोठं अंमली रॅकेट! स्थानिक गुन्हे शाखेच्या सापळ्यात लाखोंचा गांजा हस्तगत;दोघे अटकेत,एक आरोपी फरार

 दुचाकी थांबली…आणि क्षणात उघडकीस आलं मोठं अंमली रॅकेट! स्थानिक गुन्हे शाखेच्या सापळ्यात लाखोंचा गांजा हस्तगत;दोघे अटकेत,एक आरोपी फरार सचिन म...

 दुचाकी थांबली…आणि क्षणात उघडकीस आलं मोठं अंमली रॅकेट! स्थानिक गुन्हे शाखेच्या सापळ्यात लाखोंचा गांजा हस्तगत;दोघे अटकेत,एक आरोपी फरार


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:- जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री विरोधात सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील तरडगांव फाटा येथे विक्रीसाठी नेण्यात येत असलेला 9.854 किलो ग्रॅम गांजा जप्त करत एकूण 3,46,475 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एक आरोपी फरार आहे.

अहिल्यानगर जिल्हा घटकामध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी दिले होते.त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.किरणकुमार कबाडी यांनी पोउपनि.अनंत सालगुडे,समीर अभंग,पोलीस अंमलदार ह्रदय घोडके,संतोष खैरे,गणेश लबडे, श्यामसुंदर जाधव,मनोज साखरे, भाऊसाहेब काळे,अमोल कोतकर व चालक महादेव भांड यांचे पथक रवाना केले.

खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थांबाबत माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,हिरो कंपनीची सी.डी.डिलक्स मोटारसायकल क्रमांक एम.एच.16 बी 2550 वरून गांजा विक्रीसाठी तरडगाव फाट्याकडे नेण्यात येणार आहे. सदर माहिती पोलीस निरीक्षक श्री.किरणकुमार कबाडी यांना कळविण्यात आली.त्यांच्या सूचनेनुसार खर्डा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांच्यासह संयुक्त कारवाईचे नियोजन करण्यात आले.

त्यानुसार सपोनि.श्री.उज्वलसिंह राजपूत,पोलीस अंमलदार संभाजी शेंडे,शेषराव म्हस्के, बाळू खाडे,धनराज बिराजदार, शकिल बेग यांच्यासह पथकाने तरडगाव फाटा ता.जामखेड येथे सापळा रचला.दरम्यान बातमीतील नमूद मोटारसायकल येताना दिसताच पथकाने तिला थांबवून चौकशी केली.आरोपींनी त्यांची नावे सचिन नवनाथ गायकवाड (वय 25) रा. पिंपरखेड,ता.जामखेड,जि. अहिल्यानगर व सुक्षय उर्फ सोमा सुनिल काळे (वय 23) रा.खर्डा, ता. जामखेड,जि.अहिल्यानगर असल्याचे सांगितले.मोटारसायकलची झडती घेतली असता गोणीमध्ये उग्र वास येणारा,हिरवट रंगाचा पाला,फुले,बोंडे व बिया असलेला गांजा सदृश्य अंमली पदार्थ आढळून आला.चौकशीत सदर गांजा सुभम घुंगरे रा. माहीजळगांव,ता.कर्जत,जि. अहिल्यानगर (फरार) याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे आरोपींनी सांगितले.

या कारवाईत आरोपींकडून 2,45,475 रुपये किंमतीचा 9.854 किलो ग्रॅम गांजा, 30,000 रुपये किंमतीचे दोन मोबाईल, 1,000 रुपये रोख रक्कम व 70,000 रुपये किंमतीची मोटारसायकल, असा एकूण 3,46,475 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ताब्यात घेतलेल्या आरोपीं विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोना. 1566 श्यामसुंदर अंकुश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खर्डा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 11/2026, गुंगीकारक औषधिद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा 1985 चे कलम 8(क), 20(ब)(ii)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशन करीत आहे.

No comments