🇮🇳 गांधी चौकात देशभक्तीचा जल्लोष; ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 🇮🇳 नगरसेवक तथा गटनेता गजेंद्र जैसवाल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण ...
🇮🇳 गांधी चौकात देशभक्तीचा जल्लोष; ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 🇮🇳
नगरसेवक तथा गटनेता गजेंद्र जैसवाल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण
चोपडा प्रतिनिधी :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा शहरातील ऐतिहासिक महात्मा गांधी चौक येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. “चिरायू होवो भारत प्रजासत्ताक” या जयघोषात चोपडा शहर सामाजिक व सांस्कृतिक समिती यांच्या वतीने आयोजित ध्वजारोहण कार्यक्रम नगरसेवक तथा गटनेता मा. गजेंद्र जैसवाल यांच्या शुभहस्ते पार पडला. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने संपूर्ण गांधी चौक भारावून गेला. या प्रसंगी महात्मा गांधी चौकातील देशप्रेमी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी व शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सामाजिक भान जपत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व बिस्कीटचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता, तर उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमास भटू पाटील, अर्जुन चौधरी, आकाश नेवे, बंटी शिंपी, रामकृष्ण चौधरी, उमाकांत पाटील, कमलेश सोनवणे, हरीश महाजन, प्रेम घोगरे, सचिन सोनवणे, मिलिंद शिंपी, दिनेश जाधव, संदीप चव्हाण, विशाल भावसार यांच्यासह शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम व सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.



No comments