दगडी बुद्रुक येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दगडी बुद्रुक (ता. चोपडा) येथे ७७ वा प्रजासत्...
दगडी बुद्रुक येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दगडी बुद्रुक (ता. चोपडा) येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम ग्रामपंचायत दगडी बुद्रुक येथे सरपंच सौ. भारतीताई निंबा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडी बुद्रुक येथे उपसरपंच सौ. संगीता ताई आधार पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. तंबाखूमुक्त शपथ तसेच साक्षर भारत शपथ उपस्थितांकडून घेण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सामुदायिक कवायत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमास गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, माजी पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक श्री. जितेंद्र सनेर तसेच श्रीमती सुचेता सैंदाणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments