पोदार इंटरनॅशनल स्कूल, अकलूद येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) पोदार इंटरनॅशनल स्कूल, ...
पोदार इंटरनॅशनल स्कूल, अकलूद येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पोदार इंटरनॅशनल स्कूल, अकलूद येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा वर्धापन दिन दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी “वंदे मातरम्” या राष्ट्रीय भावनेवर आधारित मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाच्या प्रस्तावनेने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुण्या मा. सौ. ललिता लिलाधर पाटील (केंद्र प्रमुख, पाडसाळा) यांच्या हस्ते भारतीय संविधानावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संविधानाची उद्देशिका वाचन करून लोकशाही मूल्यांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व उपस्थितांनी राष्ट्गीताने राष्ट्रीय झेंड्यास मानवंदना दिली.पुढे उपस्थितांनी व विद्यार्थ्यांनी साक्षरता व तंबाखू-मुक्त भारतासाठी शपथ घेतली. यानंतर शाळेच्या उपप्राचार्या सौ. रेखा मुळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व, संविधानाचे मूल्य व विद्यार्थ्यांची जबाबदारी यावर प्रकाश टाकला.
सांस्कृतिक कार्यक्रमांच्या अंतर्गत इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांनी स्वागत नृत्य, प्रभावी नाट्य, सादर केले.इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध मार्च पास्ट सादर करून उपस्थितांची मने जिंकली.इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक ड्रिल सादर केली.इयत्ता ६ वी व ७ वी च्या विद्यार्थ्यांनी ‘सेव्हन सिस्टर्स’ या विषयावर आधारित मिझोरम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, त्रिपुरा, नागालंड, आसाम, मणिपूर या राज्यातील संस्कृती दर्शविणारी झाकी काढली.इयत्ता १ ली व २ री च्या चिमुकल्यांनी फॅन्सी ड्रेस सादर करत कार्यक्रमात रंगत आणली.इयत्ता ४,५,६ वी च्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी, हिंदी, मराठी भाषण सादर केले.इयत्ता ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले.कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांच्या फिनाले नृत्याने झाला. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम देशभक्ती, शिस्त व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम केले.


No comments