⚽ 🏀 🏸 🏏 ⛹️♂️ 🤼♂️ 🚴♂️ स्वातंत्र्य सैनिक श्री शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालय वर्डी ता. चोपडा जि. जळगाव प्रत...
⚽ 🏀 🏸 🏏 ⛹️♂️ 🤼♂️ 🚴♂️
स्वातंत्र्य सैनिक श्री शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालय वर्डी ता. चोपडा जि. जळगाव
प्रतिनिधी रविंद्र कोळी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वर्डी:- येथे करुणा उत्सव - 2026 अंतर्गत शालेय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन ( क्रीडा महोत्सव ) मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब श्री विनायकराव रामदास चव्हाण होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे चेअरमन आदरणीय आबासाहेब श्री हरिश्चंद्र शामराव चव्हाण उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती देवी तसेच संस्थेचे संस्थापक व मा. अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब शामराव गोविंदा पाटील व संस्थेचे सेक्रेटरी दादासाहेब आर जी झांबरे सर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री एम एस चव्हाण सर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक श्री आर.बी. साळुंखे सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते.
मुख्याध्यापक श्री एम एस चव्हाण सर यांनी आपल्या प्रास्ताविकेतून शालेय जीवनातील खेळाचे महत्व सांगितले. तसेच खेळामुळे खिलाडूवृत्तीसोबतच जिद्द, परिश्रम, संघभावना वाढीस लागण्यास मदत होते असे यावेळी पटवून दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्लो सायकल, धावण्याची शर्यत, गोंटपाठ स्पर्धा, लिंबू चमचा, संगीत खुर्ची अशा विविध मनोरंजनात्मक खेळासह मैदानी खेळ जसे की कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, बॅडमिंटन अशा अनेक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपला आनंद द्विगुणीत केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक श्री व्ही. जी. चव्हाण यांनी केले, तर आभार क्रीडा शिक्षक श्री पी.जी. पाटील यांनी मानले. फलक लेखन कलाशिक्षक श्री बी. वाय. सानप यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर बंधू भगिनींनी परिश्रम घेतले.

No comments