adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

घरपट्टी पाणीपट्टी व अन्य कर वसुलीला मुदत वाढ द्या : सरपंच परिषदची मागणी

  घरपट्टी पाणीपट्टी व अन्य कर वसुलीला मुदत वाढ द्या : सरपंच परिषदची मागणी  भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)   यावल :...

 घरपट्टी पाणीपट्टी व अन्य कर वसुलीला मुदत वाढ द्या : सरपंच परिषदची मागणी 


भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

  यावल : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत कडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी वसुलीला मुदत वाढ द्यावी अशी मागणी सरपंच परिषद मुंबई यावल तालुकाध्यक्ष संदिप भैया सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडवणीस यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत कडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी वसूलीत ५० टक्के माफ करण्यात आली होती त्यांची मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यत होती.

  मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियान राबविण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत ग्रामपचायतीचे आर्थिक स्वावलंबन हे  समृद्ध  गावाच्या निर्मितीसाठी आवश्यक असल्याने  ३१ मार्च २०२६ पर्यत मुदत वाढ  देण्यात यावी अशी मागणी यावल तालुका सरपंच परिषदचे तालुकाध्यक्ष संदिप भैय्या सोनवणे , सचिव अजय अडकमोल सह पदाधिकारी यांनी केले आहे.

No comments