अहिल्यानगर मनपा निवडणूक.. राष्ट्रवादीचे खाते उघडले प्रभाग ८ मधून कुमारसिंह वाकळे बिनविरोध सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवा...
अहिल्यानगर मनपा निवडणूक.. राष्ट्रवादीचे खाते उघडले प्रभाग ८ मधून कुमारसिंह वाकळे बिनविरोध
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.१):-अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपल्यानंतर काल अर्ज छाननी प्रक्रिया झाली. सकाळपासून विविध प्रभागांमध्ये अर्जांवरील हरकती, आक्षेप आणि सुनावण्या सुरू असून अनेक ठिकाणी उमेदवारांमध्ये आक्षेपांवरून चुरस पाहायला मिळत होती.दरम्यान, प्रभाग क्रमांक 8 मधील “ड – सर्वसाधारण” प्रवर्गात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. अर्ज छाननीनंतर या प्रभागात सुरुवातीला दोन उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे कुमारसिंह बबनराव वाकळे आणि अपक्ष उमेदवार कोलते पोपट मुरलीधर यांचा समावेश होता.मात्र आज सकाळी अपक्ष उमेदवार कोलते पोपट मुरलीधर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने, प्रभाग क्रमांक 8 मध्ये आता केवळ एकच उमेदवार शिल्लक राहिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कुमारसिंह वाकळे हे बिनविरोध निवडून आले आहेत.

No comments