शिवसेनेच्या गटनेतेपदी सागर कुमार चौधरी, उपगटनेतेपदी वैशालीताई बारी भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज जळगाव येथील...
शिवसेनेच्या गटनेतेपदी सागर कुमार चौधरी, उपगटनेतेपदी वैशालीताई बारी
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीन नगरसेवक व एका अपक्ष नगरसेवकाच्या मदतीने अधिकृतरीत्या चार सदस्यांचा स्वातंत्र्य गट स्थापन करण्यात आला. या गटामध्ये गटप्रमुख म्हणून प्रभाग क्रमांक ८ मधून निवडून आलेले युवा, दमदार नगरसेवक सागर कुमार सुनील चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. छाया ताई अतुल पाटील, उपगटनेतेपदी सौ. वैशाली निलेश बारी, तसेच अपक्ष नगरसेवक श्री. पराग विजय सराफ यांचा समावेश आहे. यावल नगरपालिकेत एकूण २३ सदस्य असून लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. छाया ताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली १२ सदस्यांचा स्पष्ट बहुमताचा गट निर्माण झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
गटनेतेपदी सागर कुमार चौधरी यांची निवड झाल्याबद्दल यावल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अतुल दादा पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गोपाळ चौधरी, तालुकाप्रमुख शरद बापू कोळी, उपशहरप्रमुख संतोष भाई खर्चे, विभागप्रमुख पप्पू भाई जोशी, माजी नगरसेवक तुकाराम अण्णा बारी, निलेश बारी,भुसावळ येथील माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल भाऊ चौधरी, यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखणारे राजू शेख, किशोर माळी, राहुल कचरे, प्रल्हाद बारी, मनोज करणकर, सारंग बेहेडे, जयेश बारी आदींसह अनेक पदाधिकाऱ्यांनी गटनेते सागर कुमार चौधरी व उपगटनेते वैशालीताई बारी यांचे अभिनंदन केले.

No comments