adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

“मिशन निरंतर मिलाप” अंतर्गत जवानांच्या कुटुंबीयांशी थेट संवाद !ब्रिगेडियर पी. सुनील कुमार यांच्या हस्ते ‘निरंतर मिलाप टीम’ला हिरवा झेंडा

 “मिशन निरंतर मिलाप” अंतर्गत जवानांच्या कुटुंबीयांशी थेट संवाद !ब्रिगेडियर पी. सुनील कुमार यांच्या हस्ते ‘निरंतर मिलाप टीम’ला हिरवा झेंडा सच...

 “मिशन निरंतर मिलाप” अंतर्गत जवानांच्या कुटुंबीयांशी थेट संवाद !ब्रिगेडियर पी. सुनील कुमार यांच्या हस्ते ‘निरंतर मिलाप टीम’ला हिरवा झेंडा


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि१०):मेकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटर अँड स्कूल, अहिल्यानगरमधील माजी सैनिक, वीरनारी तसेच शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याच्या उद्देशाने “मिशन निरंतर मिलाप 1.0” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ‘निरंतर मिलाप टीम’ला आज ब्रिगेडियर पी. सुनील कुमार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.हा उपक्रम लेफ्टनंट जनरल पी. एस. शेखावत यांच्या मार्गदर्शनाखाली संकल्पित करण्यात आला असून, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांशी थेट संपर्क साधून त्यांच्या अडचणी त्यांच्या दारातच सोडविणे, हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमास लेफ्टनंट कर्नल अशोक कुमार (चीफ रेकॉर्ड ऑफिसर व कमांडिंग ऑफिसर, रेकॉर्ड्स, मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट) तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या टप्प्यातील ‘निरंतर मिलाप टीम’मध्ये एक ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर , दोन नॉन कमिशन्ड ऑफिसर्स तसेच मेकॅनाइज्ड इन्फंट्री बटालियनचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. ही टीम केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या दक्षिण भारतातील पाच राज्यांतील १४ जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन माजी सैनिक, वीरनारी व शहीद जवानांच्या कुटुंबीयांशी संवाद साधणार आहे. त्यांच्या तक्रारी, निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा, कल्याणकारी योजना आदी विषयांवर जागेवरच मार्गदर्शन करून समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे.या उपक्रमामुळे रेजिमेंट व तिच्या माजी जवानांच्या कुटुंबीयांमधील भावनिक नाते अधिक दृढ होणार असून, त्यांच्या समस्या समजून घेत सन्मान, संवेदना व तत्परतेने मदत करण्याची भावना अधिक बळकट होणार आहे.मिशन निरंतर मिलाप’ हा उपक्रम केवळ प्रशासकीयच नव्हे तर मानवी दृष्टिकोनातून राबविण्यात येत असून, देशासाठी सेवा बजावलेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी रेजिमेंट खंबीरपणे उभी आहे, हा संदेश यातून दिला जात आहे.

No comments