adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फातिमाबी शेख:- ज्या- ज्या वेळी क्रांतिज्योत सावित्रीमाई फुले यांच्या कार्याचा गौरव होईल त्या- त्या वेळी फातिमाबी शेख हें - हीं गौरवले जातील "

  फातिमाबी शेख:- ज्या- ज्या वेळी क्रांतिज्योत सावित्रीमाई फुले यांच्या कार्याचा गौरव होईल त्या- त्या वेळी फातिमाबी शेख हें - हीं गौरवले जाती...

 फातिमाबी शेख:- ज्या- ज्या वेळी क्रांतिज्योत सावित्रीमाई फुले यांच्या कार्याचा गौरव होईल त्या- त्या वेळी फातिमाबी शेख हें - हीं गौरवले जातील  "


01 जानेवारी 1848 ही तारीख  परिवर्तन वादी महिलांना आपल्या आयुष्यातील सुवर्णाक्षणाने लिहून ठेवणारा दिवस खास करून महाराष्ट्रातील महिलांसाठी....हो..

मला वाटतं काहीतरी तर नक्कीच आठवत असेल... हो..आजचे आपले महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी स्त्री मुक्तीची पहाट केली व त्यांच्या त्या प्रदीर्घ संघर्षाला एका मुस्लिम बहीण व भावाने त्याकाळी साथ देत,  त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभी राहिलेत . 

           हो, तीच 09 जानेवारी 1831 रोजी जन्मलेली फातिमाबी शेख, हीच जी सख्या बहिणी सारखीच सावली सारखीच  क्रांतीज्योत माई सावित्रीबाई फुले बरोबर अखेरच्या स्वासा बरोबर राहिली.

महात्मा ज्योतिबा फुले व सावित्री बाई यांचा विवाह 1840 ला झालं त्यावेळी ज्योतिबा 13 वर्षाचे व सावित्रीबाई या 9 वर्षाच्या होत्या ते पुण्या जवळीळ फुरसुंगी येथील गोविंदराव गोरे यांचे चिरंजीव परंतु पुण्यात फुले विकण्याचा व्यवसाय करीत होतें म्हणून आडनाव फुले झाले. 

त्यावेळी च्या अनिस्ट रूढी - परंपारा नुसार प्रत्येक समाज गुरफटलेला होता, अंधश्रद्धा, रूढीवादी, चुकीच्या पद्धती, याने सर्व समाज हें अंधारलेल्या अवस्थेत अशिक्षित गंजलेल्या अवस्थेत होता, बिकट अवस्था झालेली होती. स्त्री महिलांची तर भयानक अवस्था होती. स्त्रीयांना घराबाहेर पडणं तर खुप मोठं पाप समजलं जायचे. समता - बंधुता या गोष्टी तर लांब लांबच,या सर्व परिस्थितीतुन काही मार्ग निघेल तो शिक्षणा नेच निघू शकतो व तो हीं  स्त्री शिक्षित होणं हें गरजेचं आहेत आणि स्त्री शिक्षण हेच या सर्व परिस्थितीला उत्तम उत्तर असू शकतं हें महात्मा ज्योतिबाच्या लक्षात आलं. म्हणून दोघानीं निर्णय घेतला की  स्त्री शिक्षित झाली पाहिजे. म्हणूनच प्रथम आपल्या घरातूनच स्त्री  शिकवण्याचं काम चालू करून नंतर आजूबाजूला स्त्री यांना शिकवण्याचं थोडं थोडं कार्य चालू केलं.  महात्मा फुले व सावित्री माय फुले जेव्हा मुलींना शिकविण्याचे कार्य करीत होते..

तेव्हा तेथील नकारात्मक विचाराच्या लोकांनी महात्मा फुले यांचे वडिल गोंविदराव यांच्याकडे तक्रार केली,  गोविंदरावांना सांगितले कि धर्मशास्त्रानुसार स्त्री शुद्र आणी शुद्राला शिक्षणाचे अधिकार नाही आधी तुझा मुलगा ज्योतिबा बिघडला आहेत व त्यानंतर आता तर तुझी सुन ही बिघडली आहेत, शुद्र असुन स्वत: शिकली तर शिकली पुन्हा इतर मुलींना शिकवत आहे. धर्मशास्त्रानुसार हे पाप आहे.  गोविंदरावाने महात्मा फुलेंना बोलावले आणी सा़गितले बघ ज्योतिबा तुला या घरात राहायचे असेल तर हे शिक्षणाचे कार्य बंद कर , जर शिक्षणाचे कार्य सुरूच ठेवशील तर या घरातुन निघुन जावं,  गोविंदरावाने आपल्या मुलाला ज्योतिबा व सुनेला सावित्री माय फुलेंना अंगाच्या कपड्यानिशी घरातून काढून दीले .

तेव्हा महात्मा फुले व सावित्री माय यांच्या मदतीला दोन मुस्लिम भाऊ बहीन आले ते भाऊ बहीन म्हणजे आई फातेमाबी शेख व मियाँ उस्मान शेख. 

उस्मान शेख व फातिमाबी शेख या भाऊ- बहीणींने महात्मा फुले व सावित्री माय फुले यांना घरात आश्रय दिला. कपड़े ,भांडी,संसाराउपयोगी अवश्यक वस्तु दिल्या.  आणि हो,  सर्वात आधी मुलिंना शिकवण्याचे कार्य सुरू झाले ते आई फातिमाबी शेख यांच्या पुणे येथील गंज पेठेतील आपल्या स्वतः च्या घरातुनच.

पहिली शाळा: जेव्हा फुले दाम्पत्याला शिक्षण प्रसारामुळे घरातून बाहेर काढण्यात आले, तेव्हा फातिमा शेख आणि त्यांचे भाऊ मियाँ उस्मान शेख यांनी त्यांना आपल्या घरात आश्रय दिला. याच ठिकाणी म्हणजे च पुणे येथील गंज पेठेत,  1848 मध्ये मुलींसाठी भारतातील पहिली शाळा म्हणजेच 'स्वदेशी ग्रंथालय' (Indigenous Library) सुरू करण्यात आली.

               महात्मा ज्योतिराव फुले यांच्या लक्षात आलं की शिकवण्या साठी विशेष प्रशिक्षणाची गरजेचं आहेत म्हणून त्यांनी, अहमदनगर येथील " अमेरिकन मिशनरी सिंथिया फरार "नें चालवलेल्या " क्लेरा ब्रुस CLERA BRUS Highschool हायस्कूल मधील शिकविण्याच्या विशेष पद्धती च्या टीचर्स ट्रेनिंग कोर्स साठी काही दिवस सावित्री बाई फुले व फातिमाबी शेख यांना पाठवून  ट्रैनिंग केलं...

त्याच वेळी तेथे सावित्री माई तेथे आजारी असताना नीं महात्मा ज्योतिबांना 10 ऑक्टोबर 1856 ला ( 10-10-1856) ला लिहिलेल्या पत्रात माई सावित्री बाई असें  लिहितात की,  " माझी काळजी करू नका, मी बरे झाल्यावर पुणे ला येईलच, फातिमाला सध्या त्रास होत असेल,  पण  ती   कुरकुर करणार नाही.. "

काही काही मुस्लिम द्वेशी सांगतात की क्रांतीसूर्या सावित्री माई बरोबरील फातिमा बी शेख हें काल्पनिक पात्र आहेत.. या पत्रा वरील उल्लेख व त्यांनी पहिल्यांदा सुरू केलेली गंज पेठेतील पहिली शाळा हेच सत्य दर्शवत आहेत की माई सावित्री फुले जी व फातिमाबी शेख किती घानिस्ट मैत्रिणी- सख्या साथी होत्या. असो.

  फातिमाबिनी  फुले दाम्पत्यांनी स्थापन केलेल्या पाचही शाळांमध्ये शिकवले आणि  सन 1851 मध्ये मुंबई मध्ये दोन शाळांच्या स्थापनेत हीं भाग घेतला,  कित्येक घरोघरी जाऊन मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांचे मन वळवले.शिक्षणा चे किती महत्व आहेत हें प्रत्येक घरा -घरात जावून समजावून सांगत असत, अनेकदा काही काही मुलींना आपल्या घरी बोलावून घरी शिकवत असत.

विरोध: शिक्षण प्रसार करताना त्यांना आणि सावित्रीबाईंना समाजातील सनातनी घटकांकडून तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. लोक त्यांच्यावर दगड आणि शेण फेकत असत.घाणघाण शिव्या घालीत असत, हें सर्व फातिमा बी नीं सोसलं. माई सावित्रीनां जें काही हाल कष्ट सहन केले ते सर्व फातिमा बी नां सहन कराव्या लागल्या.. मुस्लिम समाजात तर जास्त त्रास सहन करावा लागला..

परंतु फातिमा बी शेख फार त्रास सहन करूनही माई सावित्रीबाई फुलेंच्या खांद्याला खांदा लावून वंचित गरीब बेसहरा मुलींना शिकवण्याचे कार्य कोणत्याही विरोधाला  न जुमानता शेवटी पर्यत चालूच ठेवलं

        🌷  त्यांच्या योगदानाला अनेकदा इतिहासात दुर्लक्षित केले गेले आहे, परंतु अलिकडच्या वर्षांत त्यांच्या कार्याची दखल घेतली जात आहे. 9 जानेवारी 2022 रोजी, फातिमा शेख 191 व्या जयंतीनिमित्त, Google ने त्यांना डूडलद्वारे सन्मानित केले होते.🌷( अभिनंदनीय बाब 🌷).

🌹 तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने 1988 मध्ये प्रकाशित केलेल्या सावित्रीबाई फुले समग्र वाड मय च्या पुस्तकात पान नंबर 54 वर माई सावित्रीबाई व माँ फातिमा बी शेख या दोघीचा फोटो प्रकाशित करण्यात आला आहेत.🙏

🌹 2014 मध्ये, भारत सरकारने फातिमा बी शेख यांच्या वरील धडा आणि छाया चित्र उर्दू पुस्तकामध्ये सामाविस्ट केले होतें.

               🌷 फातिमा शेख या पहिल्या मुस्लिम शिक्षिका, ज्यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या बरोबर 175 वर्षापूर्वी मुलींच्या मध्ये शिक्षणाची ज्योत पेटवली.     

                🌷 प्रतिकूल परस्थितीमध्ये प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात जाऊन शिक्षणाचे महान कार्य करणारे महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांना साथ दिली.

                   🌷 दरवर्षी 9 जानेवारी हा दिवस आपण फातिमा शेख यांची जयंती म्हणून साजरा करतो. मात्र, केवळ जयंती साजरी करणं पुरेसं नाही; त्यांच्या विचारांची, संघर्षांची आणि योगदानाची मशाल आपल्या मनात पेटवणं अधिक गरजेचं आहे.

                  🌷   अशा अंधाराच्या काळात माणुसकीचा प्रकाश घेऊन पुढे आले कोण?

                 🌷 पुण्यातील गंज पेठ येथे राहणारे उस्मान शेख आणि त्यांची बहीण फातिमा शेख...यांनी फुले दांपत्याला आपल्या घरी आसरा दिला. हे केवळ घर देणं नव्हतं; ते होते विचारांना आश्रय देणं, क्रांतीला संरक्षण देणं आणि शिक्षणाच्या भविष्याला वाचवणं.

                   🌷  याच फातिमा शेख यांनी सावित्रीबाईंसोबत खांद्याला खांदा लावून मुलींना शिकवायला सुरुवात केली. त्या काळात शिक्षिका होणं म्हणजे समाजाच्या रोषाला आव्हान देणं होतं. तरीही सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांनी औपचारिक शिक्षण-प्रशिक्षण घेतलं आणि मगच अध्यापनाचा व्रत स्वीकारलं. हा केवळ व्यवसाय नव्हता, तर तो होता समाजपरिवर्तनाचा यज्ञ.

              🌷    सावित्रीबाईंनी महात्मा जोतिबा फुलेंना लिहिलेल्या एका पत्रातून फातिमा शेख यांचे कार्य आणि त्याग अधिक ठळकपणे समोर येतो.

              🌷 10 ऑक्टोबर 1856  रोजी लिहिलेल्या पत्रात सावित्रीबाई म्हणतात,     “ माझी काळजी करू नका. तब्येत बरी झाली की मी पुण्याला परत येईन. फातिमाला सध्या त्रास होत असेल, पण ती कुरकुर करणार नाही.”  🙏   ही एक ओळ फातिमा शेख यांच्या सहनशीलतेचा, कर्तव्यभावनेचा आणि निःस्वार्थी वृत्तीचा जिवंत पुरावा आहे. 🙏

          🌷  सावित्रीबाई आणि फातिमाबी शेख यांना अपमान, बहिष्कार, उपेक्षा आणि त्रास यांचा सामना करावा लागला; पण त्यांनी कधीही आपली वाट बदलली नाही.

     आज देशभरातील मुली शिक्षण घेत आहेत, स्वप्नं पाहत आहेत आणि स्वाभिमानाने जगत आहेत..यामागे सावित्रीबाई फुले आणि फातिमाबी शेख यांच्या संघर्षाची खोल मुळे दडलेली आहेत.

    आजच्या या पवित्र दिवशी आपण केवळ त्यांना वंदन करू नये, तर त्यांच्या विचारांचा वारसा पुढे न्यावा.

           शिक्षण, समानता आणि माणुसकी यासाठी उभं राहणं हाच त्यांना खरा अभिवादनाचा मार्ग आहे.

ज्या ज्या वेळी क्रांतिज्योत माई सावित्रीबाई फुलेंचा उल्लेख निघेल, होईल त्या त्या वेळी माँ फातिमाबी शेख यांचे योगदान हीं गौरवलं जाईल.हें त्रिवार सत्य.... 🌷

🌹9 जानेवारी 1831 फातिमाबी शेख यांचा जन्मदिवस🌹


     श्रीरामपूर शहरात दिनांक 11-01-2026 रविवारी रोजी ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था महाराष्ट्र राज्य, आयोजित 🌷4 थे राज्यस्तरीय युगस्त्री फातिमाबी  शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन.. 🌷

होत आहेत..."  मला डॉ. सलीम सिकंदर शेख, बैतुशशिफा " त्या सम्मेलणाचं  स्वागत अध्यक्ष होण्याचं भाग्य मिळालं.. 

🙏 फातिमाबी शेख यांना मनापासून विनम्र अभिवादन! 🙏

शब्दात:- डॉक्टर सलीम सिकंदर शेख

बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर

9271640014..

No comments