adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पर्यावरण संरक्षण - आपले राष्ट्रीय कर्तव्य

 पर्यावरण संरक्षण - आपले राष्ट्रीय कर्तव्य  भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -;- हेमकांत गायकवाड) यावल तालुक्यातील न्हावी येथील भारत विद्...

 पर्यावरण संरक्षण - आपले राष्ट्रीय कर्तव्य 


भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी

(संपादक -;- हेमकांत गायकवाड)

यावल तालुक्यातील न्हावी येथील भारत विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे आज दिनांक 10 जानेवारी रोजी 'प्रोटेक्ट टुडे, सिक्युअर टुमारो' या विषयांतर्गत विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण तथा कायदेविषयक जनजागृती / प्रबोधन शिबिर घेण्यात आले.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाकडून प्राप्त सूचनेनुसार तसेच अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, यावल तथा प्रथम वर्ग न्यायाधीश श्री. आर. एस. जगताप यांचे मार्गदर्शना नुसार आज यावल तालुक्यातील न्हावी येथे 'प्रोटेक्ट टुडे सिक्युअर टुमारो' या विषयांतर्गत पर्यावरण विषयक प्रबोधन शिबिर घेण्यात आले. वृक्षतोड, निसर्गात कारखानदारी क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होणारा कार्बन डाय-ऑक्साइड, तसेच हरितगृह, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर यांमधून निघणाऱ्या वायूमुळे निसर्ग चक्रात झालेले बदल, जागतिक हवामानात आलेले परिवर्तन, ग्लोबल वार्मिंग इत्यादींचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. मानवी जीवन आणि वन्यजीवन संकटात आले आहे. मानवाने लवकरच सावधगिरी बाळगली नाही किंवा उपाययोजना केल्या नाही, तर त्याला मोठ्या संकटांना सामोरे जावे लागणार आहे. पर्यावरणात असंतुलित परिस्थिती निर्माण होऊ नये, मानवी जीवनाला धोका निर्माण होऊ नये, या उद्देशाने पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व विशद करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. शशिकांत वारूळकर हे होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री. व्ही. बी. वारके हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. के. आर. वाघुळदे यांनी केले. तर सूत्रसंचालन श्री. एल. आर. सुपे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता फिरके यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक संजीव तडवी, समांतर विधी सहाय्यक अजय बढे, हेमंत फेगडे तसेच भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

No comments