adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

थेपडे विद्यालय, म्हसावदचा विद्यार्थी अरहम पठाणचा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात लक्षवेधी सहभाग

  थेपडे विद्यालय, म्हसावदचा विद्यार्थी अरहम पठाणचा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात लक्षवेधी सहभाग  जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील  (संप...

 थेपडे विद्यालय, म्हसावदचा विद्यार्थी अरहम पठाणचा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात लक्षवेधी सहभाग 


जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

​म्हसावद  येथील स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता ८ वी 'अ' मधील विद्यार्थी कुमार अरहम असलम पठाण याने नुकत्याच जळगाव येथील सेंट टेरेसा हायस्कूलमध्ये पार पडलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शाळेचे यशस्वी प्रतिनिधित्व केले. यापूर्वी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात अरहम याने तृतीय क्रमांक पटकावून शाळेचे नावलौकिक केले होते.

​दिनांक ०९/०१/२०२६ रोजी शाळेत आयोजित एका विशेष कार्यक्रमात अरहमच्या या यशाबद्दल त्याचे कौतुक करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. जी. डी. बच्छाव सर, उपमुख्याध्यापक आदरणीय श्री. एस. के. भंगाळे सर आणि पर्यवेक्षक आदरणीय श्री. के. पी. पाटील सर यांच्या हस्ते अरहमला पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र आणि 'समग्र वाङ्मय' पुस्तिका देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे प्रेरणास्थान आणि चेअरमन डॉ. केदार थेपडे सर यांनी अरहमचे विशेष अभिनंदन केले. तसेच मुख्याध्यापक श्री. बच्छाव सर, शाळेचे विज्ञान मंडळ आणि उपस्थित सर्व विज्ञान शिक्षक-शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी अरहमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments