आकाश कवडीवाले यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी झेप; थायलंडमधील ‘युनिलॅम्प लाईटींग’ कंपनीत प्रादेशिक व्यवस्थापकपदी पदोन्नती भरत कोळी यावल ता...
आकाश कवडीवाले यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी झेप; थायलंडमधील ‘युनिलॅम्प लाईटींग’ कंपनीत प्रादेशिक व्यवस्थापकपदी पदोन्नती
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल, (ता. १०)येथील सुपुत्र आकाश कवडीवाले यांची थायलंड देशातील आंतरराष्ट्रीय नामांकित ‘युनिलॅम्प लाईटींग’ कंपनीमध्ये भारतासह नजीकच्या सार्क देशांचे प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून पदोन्नती झाली आहे.
या पदोन्नतीची अधिकृत घोषणा दि. ५ जानेवारी रोजी करण्यात आली.
कंपनीत कार्यरत असताना आकाश कवडीवाले यांनी गेल्या तीन वर्षांत पश्चिम भारतातील कामकाजाचे यशस्वी नेतृत्व केले. त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे आणि उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्यामुळे कंपनीच्या कामगिरीत लक्षणीय वाढ झाली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत कंपनीने त्यांची भारतासह बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान, भूतान, मालदीव आणि अफगाणिस्तान अशा एकूण आठ देशांच्या सार्क बाजारपेठांसाठी प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली आहे.
या कालावधीत त्यांनी युनिलॅम्पच्या उत्पादन श्रेणीचे सखोल ज्ञान विकसित केले असून प्रकाशयोजना डिझायनर्स तसेच विविध चॅनेल भागीदारांशी मजबूत संबंध प्रस्थापित केले आहेत. संपूर्ण प्रदेशातील वास्तुशिल्पीय बाह्य प्रकाशयोजना बाजारपेठेची त्यांची सखोल समज कंपनीसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल यावल परिसरासह विविध स्तरांतून त्यांचे हार्दिक अभिनंदन व कौतुक होत आहे.

No comments