adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

व्हॉट्सॲपवर धमकी,खंडणी आणि हत्या करण्याचा इशारा! खंडणीखोर टोळीसह म्होरक्या गजाआड

 व्हॉट्सॲपवर धमकी,खंडणी आणि हत्या करण्याचा इशारा! खंडणीखोर टोळीसह म्होरक्या गजाआड  सचिन मोकळं अहिल्यानगर  :- (संपादक -:- हेमकांत गायकवाड) श्...

 व्हॉट्सॲपवर धमकी,खंडणी आणि हत्या करण्याचा इशारा! खंडणीखोर टोळीसह म्होरक्या गजाआड 


सचिन मोकळं अहिल्यानगर  :-

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गंभीर गुन्ह्यात खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून या प्रकरणी तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आरोपींकडून तीन मोबाईल फोन व तीन चारचाकी वाहने असा तब्बल ५४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी वैभव आसाराम खंडके (वय २७, रा. टाकळी लोणार, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १ जानेवारी २०२६ पासून अज्ञात इसमाने व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधत त्यांच्या खासगी छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत २० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. आरोपीच्या दबावामुळे फिर्यादीने संपूर्ण रक्कम न देता १ लाख ५० हजार रुपये दिले.मात्र उर्वरित रक्कम न दिल्याने संतप्त झालेल्या आरोपीने पुन्हा धमकीचे संदेश पाठवत, “तू आमची फसवणूक केली आहेस. उर्वरित खंडणीचे पैसे दिले नाहीत तर तुझी खासगी छायाचित्रे व्हायरल करून तुला किंवा तुझ्या घरातील कोणालाही दिसतील तिथे जीवे ठार मारून टाकीन” असा थेट जीवे मारण्याचा इशारा दिला.या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तपासासाठी दोन विशेष पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना संबंधित धमकी देणारा मोबाईल क्रमांक आकाश पोपट मोरे (वय २४, रा. टाकळी लोणार, ता. श्रीगोंदा) याच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्यातील साथीदारांची नावे उघड केली.

त्यानुसार आरोपी आकाश पोपट मोरे याच्यासह बापू विठ्ठल शिंदे (वय ३१) आणि किरण विठ्ठल शिंदे (वय २९, दोघे रा. वडाळी रोड, श्रीगोंदा) यांना दि. १५ जानेवारी २०२६ रोजी अटक करण्यात आली. आरोपींना मा. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी, श्रीगोंदा यांच्यासमोर हजर केले असता त्यांना दि. २० जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीस कोठडीदरम्यान आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले तीन मोबाईल फोन व तीन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली असून जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ५४ लाख ८० हजार रुपये इतकी आहे. या गुन्ह्यात आणखी आरोपी व वाहने निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी गहिनीनाथ यादव, महादेव कोहक, अरुण पवार, सचिन वारे, विवेक दळवी, मयुर तोरडमल तसेच दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडु व नितीन शिंदे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे व पोलीस कॉन्स्टेबल सचिन वारे करत आहेत.

No comments