नगरचे नाव बदलून थांबणार नाही तर अहिल्यादेवीची राजधानी माहेश्वर प्रमाणे अहिल्यानगर बनवू-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सचिन मोकळं अहिल्यानगर...
नगरचे नाव बदलून थांबणार नाही तर अहिल्यादेवीची राजधानी माहेश्वर प्रमाणे अहिल्यानगर बनवू-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:-नगर शहराला व जिल्ह्याला केवळ अहिल्यादेवीचे नाव देवून आम्ही थांबणार नाहीत तर ज्याप्रमाणे पूर्वी पूर्वीच्या काळी अहिल्यादेवींनी त्यांची राजधानी महेश्वर ही अत्यंत सुसज्जित नेली त्याप्रमाणे अहिल्यानगर केल्याशिवाय राहगार नाही असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले.शहर हे उत्तम झाले पाहिजे परंतु शहर उत्तम करत असताना त्या ठिकाणी मुलांच्या हाताला काम मिळाले पाहिजे.एमआयडीसीचा विस्तार होऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग आले पाहिजेत. हा देखिल आमचा प्रयत्न आहे. राज्यशासनाने अहिल्यानगरला नॅशनल डिफेन्स कॉरिडॉर भाग म्हणून सिलेक्ट केले आहे.या ठिकाणी तो करून हजारो हाताला काम देणारे उद्योग आणण्याचे काम केले करण्यात येणार आहे असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीतील भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मार्केटयार्ड चौकातील पांजरापोळ येथे आयोजित प्रचारसभेत ना.फडणवीस हे बोलत होते.याप्रसंगी विधानपरिषरेचे सभापती प्रा.राम शिंदे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,आ. संग्राम जगताप,आमदार मोनिका राजळे,आमदार विक्रमसिंह पाचपुते,माजी खासदार सुजय विखे पाटील,माजी मंत्री बबनराव पाचपुते,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जयदीप कवाडे आदीसह दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.ना. फडणवीस यांनी आपल्या भाषणात मतदारांनी दि.१५ जानेवारी रोजी मतदान करताना कोणतीही चिंता न बाळगता राबावे.तुमच्या शहराच्या विकास चिंता आमच्यावर सोडावी असे आवाहन केले.प्रचार समेत सिस्पे, ग्रो-मोभर,आरीच्या आर्थिक घोटाळ्याबाबत सिस्पेमधील काही गुंतवणूकदारांच्यातर्फे ना. फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.जिल्यातील या आर्थिक घोटाळ्यांच्या मुद्दयावर बोलतांना ना.फडणवीस यांनी साखळी पद्धतीने गोरगरिबांना लुबाडण्याचे जे काम झाले.यातील आरोपींना सोडले जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी आपल्या भाषणात या घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे दिला पाहिजे त्यासाठी देशाचे गृहमंत्री यांच्याशी चर्चा करून देखिल त्याना विनंती करणार आहे.संबंधित घोटाळे सीबीआयमार्फत चौकशीला घ्या व ज्या ज्या लोकांनी गरीबांचा पैसा खाला असेल त्यांना जेलची हवा खायला पाठवा आणि गरीबांचा पैसा परत आणून त्यांना परत दया हे काम देखिल पुढील काळात आपल्याला निश्चतपणे करायचे असल्याचे ना.फडणवीस यांनी सांगितले जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,नगर शहराच्या रुपये ४९२ कोटी खर्चाच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी लवकरच एका महिन्यात देवू असे फडणवीस यांनी सांगितले.शहरात प्रत्येक घरात,प्रत्येक दिवशी माता-भगिनींनी नळ उघडला तर त्याला पाणी आले पाहिजे असे ते म्हणाले.भाषणात अहिल्यानगर महापालिकेवर भाजपा-राष्ट्रवारी काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचा संकल्प मतदारांनी केला अजून यापूर्वी जिल्हयात विधानसभा व नगरपालिकेच्या निवडणुकीत युतीना झेंडा फडकनिण्यानी हॅटट्रीक महापालिका निवडणूकीत पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला तरोच मुख्यमंत्र्यांनी नगर शहर दत्तक घ्यावे अशी मागणी केली.आ.संग्राम जगताप यांनी आपल्या भाषणात नगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर झाल्यानंतर महापालिकेची ही पहिली सार्वत्रिक निवडणूक आहे. आम्ही विकासाच्या मुद्दयावर निवडणूक लढवत आहोत परंतु काही जण हमारे सोचके लोग, चुनके दिये तो ४० नाम बदलेंगे असे म्हणतात परंतु या शहराचे नाव कदापी बदलणार नाही असे सांगितले आम्ही शहरात विकासाची कामे केली,करत आलो व ती करतच राहणार आहोत.राज्यात युतीमध्ये काय चालले, महानगरपालिकेत युतीचे ५ जण बिननिरोध झाले या मधून जनतेचा कौल समोर आला आहे. यावेळी पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आभार मानले.

No comments