बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलिप ढेरे नेहमीच प्रयत्नशील, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी ! संभाजी पुरीगोसावी ( सोला...
बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलिप ढेरे नेहमीच प्रयत्नशील, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी !
संभाजी पुरीगोसावी ( सोलापूर जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सोलापूर जिल्हा पोलीस दलातील बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप ढेरे नेहमीच प्रयत्नशील असे उद्गगार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी काढले आहेत. बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप ढेरे यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्याचा पदभार दिनांक 16 ऑक्टोंबर 2024 रोजी स्वीकारला आहे. कर्तव्यनिष्ठ आणि कार्यक्षम धडाडीचे अधिकारी म्हणून दिलीप ढेरे यांना पोलीस खात्यात ओळखले जाते. पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून आपल्या मोठमोठ्या कामगिरीतून तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात ते नेहमीच प्रयत्नशील दिसून येतात. आणि त्यामुळेच अशा या विविध कामगिरीमुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांना नेहमीच सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून त्यांचा सन्मान करून त्यांना गौरवण्यात येत असतं. आगामी विधानसभा निवडणुकीतही शांतता राखल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला होता. तसेच त्यांनी बार्शी तालुका पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये 693 किलो गांजा हस्तगत करण्यात या ऐतिहासिक कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यावेळी त्यांना सन्मानपत्रक व ट्रॉफी देवुन गौरविण्यात आले होते. बार्शी तालुका परिसरांतील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून वेळोवेळी सर्वांनाच मार्गदर्शन करणारे आणि शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी शेतकरी वर्ग तसेच सर्वसामान्यांमध्ये देखील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांना चांगलेच ओळखले जाते एक खाकी वर्दींतील ( देवमाणूस ) आणि सर्वसामान्यांना प्रथम न्याय देणारा अधिकारी म्हणून देखील त्यांना चांगलेच ओळखले जाते. आपल्या विविध कामगिरीने नेहमीच चर्चेत असणारे बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप ढेरे यांचे आज रोजी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानित करून गौरविण्यात आलं यावेळी पोलीस अधीक्षकांनी दिलीप ढेरे यांच्या कामगिरीबद्दल विशेष कौतुक करून दिलीप ढेरे नेहमीच प्रयत्नशील असेही उद्गगार काढले आहेत.

No comments